जाहिरात
मराठी बातम्या / मनी / आनंदाची बातमी! या योजनेंतर्गत सरकारकडून शेतकऱ्यांना 90 टक्के सब्सिडी

आनंदाची बातमी! या योजनेंतर्गत सरकारकडून शेतकऱ्यांना 90 टक्के सब्सिडी

आनंदाची बातमी! या योजनेंतर्गत सरकारकडून शेतकऱ्यांना 90 टक्के सब्सिडी

दिवाळीनंतर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी एका योजनेंतर्गत सब्सिडी देण्याची घोषणा केली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : दिवाळीनंतर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी एका योजनेंतर्गत सब्सिडी देण्याची घोषणा केली आहे. 90 टक्क्यांपर्यंत ही सब्सिडी मिळत असल्याने आता शेतकऱ्याच्या डोक्यावरचं थोडं आर्थिक ओझं कमी होणार आहे. तुम्हीही शेतकरी असाल किंवा तुमच्या नातेवाईकांपैकी कुणाची शेती असेल तर ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. आज सरकारच्या अशा एका योजनेबद्दल सांगणार आहोत, जी शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मदत करते. शेतकरी शेतात पाणी देण्यासाठी इलेक्ट्रिक ट्यूबवेलचा वापर करतात. त्यांची इच्छा असल्यास त्यांना कमी खर्चात चांगल्या सुविधा मिळू शकतात. शेतकऱ्यांना सौरऊर्जेचा वापर करून कमी खर्चात चांगली पिके घेता यावी, यासाठी पीएम कुसुम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौरपंप बसविण्याची सुविधा केंद्र सरकार देत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकारकडून मदत मिळते.

सण उत्सवात प्लास्टिक फुलांचाच बोलबाला, शेतकरी संकटात, पाहा Video

90 टक्के मिळणार सब्सिडी या योजनेंतर्गत केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना 60 टक्क्यांपर्यंत अनुदान देतं. त्याचबरोबर 30 टक्के लोक बँकेच्या माध्यमातून कर्ज घेऊ शकतात. जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी सौरपंपाद्वारे शेतात सिंचन करू शकतील. ही योजना 2019 मध्ये सुरू झाली आणि त्यानंतर ती ज्यांच्या घरात शेती आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली आहे.

News18लोकमत
News18लोकमत
PM Kisan Yojna: पती-पत्नी दोघांनाही पीएम किसान योजनेचा लाभ मिळेल का? काय आहेत नियम?

कसा घ्यायचा लाभ? या योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या. india.gov.in अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही त्याचा ऑनलाइन फॉर्म भरू शकता. ऑनलाइन नोंदणी अर्ज भरल्यानंतर आधार कार्ड, खसऱ्यासह जमिनीची कागदपत्रे, डिक्लरेशन फॉर्म, बँक खात्याचा तपशील आदी आवश्यक माहिती द्यावी लागणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात