नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवते. पीएम किसान सन्मान निधी योजना ही अशीच एक योजना आहे. या योजनेद्वारे सरकार दरवर्षी सहा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करते. ही रक्कम 2 हजार रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये दिली जाते. नुकताच देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना याचा हप्ता मिळाला. पीएम किसान योजनेच्या नियमांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. आता या योजनेचा फायदा शेतकरी कुटुंबातील पती-पत्नी दोघांना होणार असल्याची चर्चा आहे. या प्रश्नाच्या उत्तरासह आम्ही या योजनेच्या उर्वरित नियमांची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. पती-पत्नी दोघांनाही लाभ मिळेल का? पीएम किसान सन्मान निधी योजना शेतकरी कुटुंबासाठी चालवली जाते. त्यामुळे पती-पत्नी दोघेही शेतकरी असले तरी कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे. खुद्द सरकारने पीएम किसान पोर्टलवर याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. या योजनेत शेतकरी कुटुंबातील एकच व्यक्ती नोंदणी करू शकते. यासाठी एकापेक्षा जास्त व्यक्तींनी नोंदणी केल्यास ती रद्द केली जाईल. त्याचबरोबर या योजनेचा लाभ दोन्ही लोकांना मिळत असेल, तर सरकार ते कधीही वसूल करू शकते. वाचा - पॉलिसी होल्डरचा मृत्यू झाल्यावर कोण भरणार प्रीमियम? काय आहे LIC चं धोरण क्या है पीएम किसान योजना की योग्यता पीएम किसान सम्मान निधि योजना का लाभ गरीब तबके के किसानों को मिलता है. इस योजना में रजिस्टर करने के लिए किसानों के पास 2 हेक्टेयर से ज्यादा की जमीन नहीं होनी चाहिए. इसके साथ ही किसान किसी सरकारी पेंशन स्कीम का लाभार्थी नहीं होना चाहिए. इनकम टैक्स रिटर्न दाखिल करने वाला व्यक्ति भी इस योजना का लाभ नहीं उठा सकता है. पीएम किसान योजना आणि त्याचे नियम या योजनेच्या नियमांनुसार एखाद्या शेतकऱ्याने आपल्या शेतजमिनीचा वापर शेतीच्या कामाव्यतिरिक्त इतर कामासाठी केल्यास किंवा एखाद्या शेतकऱ्याने दुसऱ्याच्या शेतात भाड्याने शेती केल्यास त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. सोबतच जर एखादा शेतकरी असेल ज्याची स्वतःची जमीन असेल पण ती त्याच्या नावावर नसून वडिलांच्या किंवा आजोबांच्या नावावर असेल तर त्यालाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
17 ऑक्टोबर रोजी 12 व्या हप्त्याचे पैसे मिळाले पीएम किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारने 2019 मध्ये सुरू केली. दिवाळीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांना एक मोठी भेट दिली होती. त्यांच्या खात्यात 12 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेअर केले होते.