नवी दिल्ली, 22 जुलै : पेटीएमच्या सिस्टममध्ये एका त्रुटीचा फायदा उचलून एका व्यक्तीने कंपनीला 2 कोटींचा चुना लावला आहे. पोलिस सांगतात की, फसवणुकीतील रक्कम वाढूही शकते कारण चौकशी दरम्यान फसवणूक करणार्याने सांगितले आहे की त्याने पेटीएम वरून पैसे हडपण्याची युक्ती नातेवाईकांना देखील सांगितली होती. पोलिसांना या संपूर्ण फसवणुकीची माहिती मिळाली नसती तर पेटीएमचे आणखी नुकसान झाले असते. पेटीएमला या फसवणुकीची माहिती नसल्यामुळे असं घडत होतं. सध्या तरी पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या तरुणाची ओळख उघड केलेली नाही.
हे प्रकरण फरिदाबादचे आहे. क्रेडिट कार्ड पेमेंट करताना पेटीएम सिस्टममधील त्रुटीचा गैरफायदा येथील एका तरुणाने घेतला आहे. पेटीएम प्लॅटफॉर्मवरून क्रेडिट कार्ड बिल भरता येते. परंतु, पेमेंट प्रोसेसमध्ये तांत्रिक बिघाड झाला. या त्रुटीचा फायदा आरोपी तरुणाने घेतला. सध्या पेटीएमची पेरेंट कंपनी 91 कम्युनिकेशनच्या प्रतिनिधीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पेटीएममधून फसवणूक करून 2 कोटींहून अधिक रक्कम चोरल्याचा पोलिसांना संशय आहे. धक्कादायक! मित्राच्या नावानं पेटीएम अकाउंट रजिस्टर करून मित्रालाच लावला लाखो रुपयांना चुना असे हडप केले 2 कोटी रुपये ज्यावेळी एखादी व्यक्ती क्रेडिट कार्डचे बिल भरते, तेव्हा पेटीएमची रक्कम लगेच क्रेडिट कार्डमध्ये ट्रान्सफर केली जाते. त्याच वेळी, ग्राहकाने दिलेली रक्कम काही काळ पेटीएम प्लॅटफॉर्मवर राहते. सुमारे 5 मिनिटांनंतर, पेमेंट यशस्वी झाल्याचा मॅसेज येतो. IDFC बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यावर ग्राहकाने दिलेली रक्कम 4 तास पेटीएम प्लॅटफॉर्मवर राहत होती. तांत्रिक बिघाडामुळे 24 तासानंतरही पेमेंट सक्सेसफुल होण्याऐवजी पेमेंट कॅन्सलचा ऑप्शन दिसत होता. पेमेंट कॅन्सल केल्यावर, ग्राहकाने भरलेली रक्कम ग्राहकाच्या खात्यात परत केली जाईल. त्याचवेळी त्याच्या क्रेडिट कार्डचे बिल आधीच भरलेले असायचे. याचा फायदा घेत आरोपी तरुणाने कॅन्सल पेमेंट पर्यायाचा सुमारे 200 वेळा वापर करून पेटीएममधून सुमारे 2 कोटी रुपये काढून घेतले. हे काम तो 3 महिने करत होता. आता कोणतंही तिकिट कँसल करणं झालं सोपं! Paytm देणार 100% रिफंड पेटीएमला याची कल्पनाच नव्हती पेटीएमला त्यांच्या प्लॅटफॉर्ममधील तांत्रिक बिघाडाची माहितीही नव्हती. या संपूर्ण फसवणुकीची माहिती कोणीतरी फरिदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेला दिली. पोलिसांनी आरोपी तरुणाला पकडून त्याची चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनीच कंपनीला माहिती दिली. त्यानंतर कंपनीने गुन्हा दाखल केला. हडप केलेली रक्कम 2 कोटींपेक्षा खूप मोठी असू शकते. कारण, आरोपी तरुणाने आपल्या नातेवाईक आणि मित्रांनाही फसवणुकीची ही आयडिया सांगितली होती. या पद्धतीने मोठ्या प्रमाणात लोक पैसे हडप करत असल्याची भीती व्यक्त होतेय. सध्या फरीबदच्या सेक्टर 65 ची गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे.