मराठी बातम्या /बातम्या /मनी /आता कोणतंही तिकिट कँसल करणं झालं सोपं! Paytm देणार 100% रिफंड

आता कोणतंही तिकिट कँसल करणं झालं सोपं! Paytm देणार 100% रिफंड

पेटीएमची ग्राहकांसाठी खास सुविधा

पेटीएमची ग्राहकांसाठी खास सुविधा

पेटीएम एक नवीन सबस्क्रिप्शन मॉडेल घेऊन आलेय. जे यूझर्सला तिकीट बुकिंगवर पूर्ण रिफंड देईल. मग ती बस असो किंवा फ्लाइट तुम्ही तिकिट रद्द केल्यावर तुम्हाला पैसे परत येतील. त्याला कॅन्सल प्रोटेक्ट असे नाव देण्यात आलंय. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 22 फेब्रुवारी: भारतातील लोक UPI व्यवहारांसाठी किंवा इतर पेमेंटसाठी वेगवेगळे अ‍ॅप वापरतात. यामध्ये पेटीएमचाही समावेश आहे. Paytm, One97 Communications ची ऑनलाइन पेमेंट सेवा आहे. यामध्ये तिकीट बुकिंग, बिल पेमेंट आणि इतर सेवांसाठी पर्याय मिळतात. पेटीएमने आपल्या यूझर्सला एअरलाइन्स किंवा बस ऑपरेटरकडून आकारल्या जाणाऱ्या कँसिलेशन चार्जपासून वाचवण्यासाठी नवीन सबस्क्रिप्शन मॉडेल जाहीर केलेय. याला कॅन्सल प्रोटेक्ट प्रीमियम असं नाव देण्यात आलंय.

पेटीएम कँसल प्रोटेक्ट प्रीमियम

नावाप्रमाणेच, ही एक प्रीमियम योजना आहे. जी तुम्हाला फ्लाइटपासून ते बस बुकिंग रद्द केल्यावर 100% परतावा देईल. यासाठी, तुम्हाला 'कॅन्सल प्रोटेक्ट' प्रीमियम खरेदी करावा लागेल. जो फ्लाइटपासून ते बसपर्यंतच्या बुकिंगसाठी वेगवेगळा असेल. चला तर मग जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.

Passport काढणाऱ्यांना सरकारने दिला इशारा! जाणून घ्या अन्यथा होईल मोठे नुकसान

पेटीएम कँसल प्रोटेक्ट प्रीमियमची किंमत

तुम्ही फ्लाइट तिकिटसाठी 149 रुपये आणि बस तिकिटसाठी 25 रुपयांचा 'कॅन्सल प्रोटेक्ट' प्रीमियम खरेदी करू शकता. यामुळे तुम्हाला फ्लाइट किंवा बस तिकीट रद्द केल्यावर 100 रिफंड मिळेल.

हे फिचर कसं काम करतं?

Paytm चं Cancel Protect Premium ग्राहकांना Paytm द्वारे रद्द केलेल्या ट्रिपसाठी फ्लाइटच्या नियोजित उड्डाणाच्या वेळेच्या किमान 24 तास आधी आणि बसेसच्या नियोजित सुटण्याच्या वेळेच्या किमान 4 तास आधी कँसल करावं लागेल. मगच तुम्हाला 100% परतावा मिळू शकेल. कंपनीचा दावा आहे की 'कॅन्सल प्रोटेक्ट' सह रिफंड राशीवर कोणतीही कॅप नाही. तसेच कँसल केल्यावर भाडे तत्काळ सोर्स अमाउंटमध्ये जमा होईल.

जुनं सॅलरी अकाउंट बंद करायचंय? अवश्य जाणून घ्या 'या' गोष्टी

अधिक बचत करण्यास मदत होते

नवीन प्रीमियम योजनेच्या घोषणेदरम्यान, पेटीएमच्या प्रवक्त्याने सांगितले, 'आम्ही आमच्या अ‍ॅपवर अनेक ग्राहक-अनुकूल उत्पादन वैशिष्ट्ये सादर केली आहेत, ज्यामुळे प्रवास बुकिंग अनुभव सुलभ झाला आहे. तसेच भारतीय प्रवाशांच्या गरजा पूर्ण झाल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: Paytm