लॉकडाऊनमध्ये छोट्या व्यवसायिकांसाठी खूशखबर! फेसबुक सुरू करणार 'ऑनलाइन दुकान'

लॉकडाऊनमध्ये छोट्या व्यवसायिकांसाठी खूशखबर! फेसबुक सुरू करणार 'ऑनलाइन दुकान'

जगभरातील सर्वात मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असणारे 'फेसबुक' Shops ही एक नवीन सर्व्हिस सुरू करणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 मे : जगभरातील सर्वात मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असणारे 'फेसबुक' Shops  ही एक नवीन सर्व्हिस सुरू करणार आहे. फेसबुक सीईओ मार्क झुकरबर्ग (Facebook CEO Mark Zuckerberg) यांनी सांगितले की या सुविधेच्या माध्यमातून दुकानदार त्यांचे दुकान फेसबुकवर सुरू करू शकतात. त्यांच्या पद्धतीने ते वस्तू आणि सामान ऑनलाइन दाखवू शकतात. छोट्या आणि मध्यम पातळीवरील व्यवसायिकांना ऑनलाइन प्लॅटफॉर्म मिळावा आणि सध्या कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटकाळात ते स्वत:ला वाचवू शकतील, असे या सुविधेमागचे ध्येय आहे.

कसं होणार फेसबुक शॉप्सवर काम?

-Facebook Shops च्या माध्यमातून एक सिंगल ऑनलाइन स्टोअर बनवण्यात येईल जे फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर उपलब्ध असेल.

-यातील चेकआऊट फीचरच्या माध्यमातून in-app खरेदी करता येईल आणि मेसेजिंग फीचरच्या माध्यमातून कस्टमर WhatsApp आणि Instagram Direct वर व्यवसायिकांसाठी संभाषण देखील करू शकतात.

(हे वाचा-लॉकडाऊनमध्ये बंद होईल तुमचे पीएफ खातं! जर EPFO च्या या नियमांचं केलं नाही पालन)

-मार्क झुकरबर्ग यांनी अशी माहिती दिली की, आणखी 7 ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सबरोबर मिळून या फेसबुकच्या या प्लॅटफॉर्मवर अधिक व्यवसायिक आणि प्रोडक्ट्सबरोबर जोडले जाण्याचा मानस आहे.

-ऑनलाइन दुकान व्यवसायिकांच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजवर पाहता येतील. त्याचप्रणामे दुकानदार स्टोरीज देखील पोस्ट करू शकतात तसंच ऑनलाइन जाहीरात देण्याचा देखील पर्याय आहे.

-व्यवसायिकांनी उपलब्ध केलेले प्रोडक्ट्स ग्राहकांना कार्टमध्ये टाकता येतील किंवा ऑर्डर देखील देता येईल. फेसबुकने गेल्या वर्षी इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर काही मर्यादित शॉपिंग पर्याय उपलब्ध करून दिले होते. हीच सुविधा आता विस्तारित स्वरूपात पुरवण्यात येणार आहे.

(हे वाचा-SBI अलर्ट! बँकेने ग्राहकांना पाठवला हा संदेश, दुर्लक्ष केल्यास होणार मोठं नुकसान)

-कंपनीचे असे म्हणणे आहे की, या निर्णयात युजर ग्रोथ कमी असली तरीही कंपनीचे हे प्लॅटफॉर्म अधिक बिझनेस फ्रेंडली बनेल आणि फेसबुकचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.

-कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी एका लाइव्ह स्ट्रिमिंगदरम्यान सांगितले की या काळात अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी ई-कॉमर्सचा विस्तार करणे आवश्यक आहे.

संकलन, संपादन - जान्हवी भाटकर

First published: May 20, 2020, 12:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading