Home /News /money /

लॉकडाऊनमध्ये बंद होईल तुमचे पीएफ खातं! जर EPFO च्या या नियमांचं केलं नाही पालन

लॉकडाऊनमध्ये बंद होईल तुमचे पीएफ खातं! जर EPFO च्या या नियमांचं केलं नाही पालन

काही महत्त्वाचे नियम समजून घेणे पीएफ खातेधारकांसाठी महत्त्वाचे आहे. काही नोकरदारांना ही माहिती नसल्यामुळे त्यांचे खाते बंद होण्याची देखील शक्यता असते.

    नवी दिल्ली, 20 मे : पीएफचे (PF-Provident Fund) ची मिळणारी रक्कम कोणत्याही नोकदारासाठी महत्त्वाची असते. कारण हे पैसे तिच्या किंवा त्याच्या आयुष्याची कमाई असतात. ईपीएफमधून पैसे काढणे तसंच ट्रान्सफर करण्यासाठी विविध नियमांची अंमलबजावणी करणे आवश्यक असते. हे नियम समजून घेणे पीएफ खातेधारकांसाठी महत्त्वाचे आहे. काही नोकरदारांना ही माहिती नसल्यामुळे त्यांचे खाते बंद होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे अशा नियमांबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत, ज्यामुळे तुमचे खाते बंद होऊ शकते. कधी बंद होते EPF खाते? जर तुमची  जुनी कंपनी बंद झाली आहे आणि तुम्ही तुमचे पैसे नवीन कंपनीच्या खात्यामध्ये ट्रान्सफर नाही केले आहेत किंवा खात्यामध्ये 36 महिन्यांसाठी कोणतेही ट्रान्झाक्शन नाही झाले तर नियमांनुसार तुमचे खाते बंद होईल. EPFO अशा खात्यांना निष्क्रिय (inactive) कॅटेगरी मध्ये टाकते. (हे वाचा-विक्रमी वाढीनंतर सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, असे आहेत आजचे दर) खाते निष्क्रिय झाल्यास पैसे काढण्यास समस्या येऊ शकतात. खाते अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी मग EPFO मध्ये संपर्क करावा लागेल. मात्र खाते निष्क्रिय झाल्यास त्यातील रकमेवर व्याज मिळत राहते. कोणत्या खात्यांना निष्क्रिय म्हणता येईल? 36 महिन्यांच्या पेक्षा जास्त कालावधीसाठी ज्या खात्यामध्ये कोणतेही ट्रान्झाक्शन झालेले नाही, अशा खात्यांना निष्क्रिय खाते म्हटले जाते. म्हणजे या कालावधीकरता तुमच्याकडून किंवा तुमच्या कंपनीकडून त्या खात्यामध्ये पैसे जमा केले गेले जात नाहीत, अशावेळी खाते निष्क्रिय होते. याआधी या खात्यांवर व्याज मिळत नसे पण 2016 पासून बदललेल्या नियमांनतर अशा खात्यांवरही व्याज मिळते. काय आहेत नियम? EPF ने जारी केलेल्या निवेदनात काही नियम सांगितले आहेत. त्यानुसार  निष्क्रिय खात्यांसंबधित क्लेम पूर्ण करण्यासाठी सावधानता बाळगणे आवश्यक आहे. (हे वाचा-चीनमधून बाहेर पडली ही जर्मन कंपनी, भारतात सुरू करणार व्यवहार) यावेळी फसवणूक होण्याबाबत सावधानता बाळगणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे सही दावेदारांनाच क्लेमची रक्कम मिळणे गरजेचे आहे. निष्क्रिय खात्यांचे क्लेम कर्मचाऱ्यांच्या नोकरी देणाऱ्या मालकाकडून सर्टिफाइड होणे आवश्यक आहे. ज्या कर्मचाऱ्यांची कंपनी बंद झाली आहे आणि हे क्लेम सर्टिफाइड करण्यासाठी कुणी नाही आहे, अशावेळी हे क्लेम बँकेकडे असणाऱ्या केवायसी डिटेल्सच्या मदतीने पूर्ण केले जाऊ शकतात.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या