Home /News /money /

Jio मध्ये Facebook आता सर्वात मोठा भागीदार, जाणून घ्या या करारातील 8 महत्त्वाच्या गोष्टी

Jio मध्ये Facebook आता सर्वात मोठा भागीदार, जाणून घ्या या करारातील 8 महत्त्वाच्या गोष्टी

फेसबुक रिलायन्स जिओमध्ये भागधारक असलेली सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. भारतामध्ये टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये एफडीआय (FDI) अंतर्गत ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे.

    नवी दिल्ली, 22 एप्रिल : जगभरातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग साइट असणाऱ्या फेसबुकने (Facebook) देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असणाऱ्या रिलायन्स जिओमध्ये (Reliance Jio) 43,574 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. फेसबुकने उद्योगपती मुकेश अंबानींच्या मालकीच्या असणाऱ्या जिओमध्ये 9.99 टक्क्यांची भागीदारी खरेदी केली आहे. बुधवारी फेसबुकने यासंदर्भात घोषणा केली. या करारामुळे फेसबुक रिलायन्स जिओमध्ये भागधारक असलेली सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. भारतामध्ये टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये एफडीआय (FDI) अंतर्गत ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. (हे वाचा-लॉकडाऊनमध्ये Google, Amazonमध्ये कामाची संधी, 2 लाख नोकऱ्या देणार या कंपन्या) रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी एका व्हिडिओ निवेदनात या भागीदारीबद्दल माहिती दिली. मुकेश अंबानी यांनी सांगितले की, "दीर्घकालीन भागीदार म्हणून फेसबुकचे स्वागत करण्यात मला आनंद होत आहे. हा करार भारताला जगातील आघाडीच्या डिजिटल देशांपैकी एक बनविण्यासाठी फायद्याचा आहे. पंतप्रधान मोदींचे डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे." तसेच, "मार्क झुकरबर्ग आणि माझ्यासाठी डिजिटल परिवर्तन आणि सर्व भारतीयांची सेवा करणे हा या भागीदारीचा मुख्य उद्देश आहे", असे सांगितले. फेसबुक आणि जिओ करारातील महत्त्वाच्या गोष्टी 1. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असणाऱ्या रिलायन्स जिओमध्ये 9.99 टक्क्यांची भागीदारी करत 43 हजार 574 कोटींची गुंतवणूक केली आहे. 2. फेसबुकच्या या गुंतवणुकीनंतर जिओ प्लॅटफॉर्म्सची एंटरप्राइज वॅल्यू 4.62 लाख कोटी झाली आहे. 3. या  करारानंतर जिओ प्लॅटफॉर्मध्ये छोट्या भागीदारांच्या श्रेणीमध्ये फेसबुकची भागीदारी सर्वाधिक आहे. (संबधित-Jio आणि Facebook भारतातील लोकांना व्यवसायाच्या नव्या संधी देणार : मार्क झुकरबर्ग) 4. या करारामुळे आरआयएल (Reliance Industries Limited - RIL) वरील कर्ज कमी होण्यास मदत होईल. ज्यानंतर हा पैसा Jio आणि इतर व्यवसायांंच्या वृद्धीसाठी वापरण्यात येईल. 5. या करारानंतर देशातील सर्वात मोठ्या प्रायव्हेट कंपनीला मार्च 2021 पर्यंत त्यांचं कर्ज पूर्णपणे फेडण्याचं लक्ष्य पूर्ण करण्यात मदत होईल. 6. जिओ प्लॅटफॉर्म, रिलायन्स रिटेल आणि व्हाट्सअ‍ॅपमध्ये सुद्धा करार होईल. रिलायन्स रिटेलच्या नवीन कॉमर्स व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी हा करार होईल. 7. JioMart आणि WhatsApp मिळून भारतातील 3 कोटी किराणा दुकाने सक्षम करणार असल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितले आहे. जिओमार्ट प्लॅटफॉर्मवर रिटेल व्यवहार वाढवण्यासाठी करार होणार आहे. व्हाट्सअ‍ॅपवरून छोट्या व्यापाऱ्यांना सपोर्ट मिळेल. (संबधित-JioMart आणि WhatsApp भारतातील 3 कोटी किराणा दुकाने सक्षम करणार : मुकेश अंबानी) 8. जिओमार्टबरोबरच्या पार्टनरशीपचा छोट्या किराणा व्यापाऱ्यांना फायदा होईल. संपादन - जान्हवी भाटकर
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Facebook, Mukesh ambani

    पुढील बातम्या