Home /News /mumbai /

JioMart आणि WhatsApp मिळून भारतातील 3 कोटी किराणा दुकाने सक्षम करणार : मुकेश अंबानी

JioMart आणि WhatsApp मिळून भारतातील 3 कोटी किराणा दुकाने सक्षम करणार : मुकेश अंबानी

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीची कंपनी रिलायन्स जिओमध्ये फेसबुकने 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

    मुंबई, 22 एप्रिल : अमेरिकेतील सोशल मीडिया कंपनी फेसबुक (Facebook) ने भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या jio सोबत मोठा करार केला आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या डिजिटल ऑपरेशनने रिलायन्स जिओमध्ये फेसबुकने 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. फेसबुक (Facebook ) कंपनीची Jio मध्ये 9.99 टक्के भागीदारी विकत खरेदी केली आहे. फेसबुकने यासंदर्भात बुधवारी मोठी घोषणा केली. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी एका व्हिडिओ निवेदनात या भागीदारीबद्दल माहिती दिली. मुकेश अंबानी यांनी सांगितले की, "दीर्घकालीन भागीदार म्हणून फेसबुकचे स्वागत करण्यात मला आनंद होत आहे. हा करार भारताला जगातील आघाडीच्या डिजिटल देशांपैकी एक बनविण्यासाठी फायद्याचा आहे". तसेच, "मार्क झुकरबर्ग आणि माझ्यासाठी डिजिटल परिवर्तन आणि सर्व भारतीयांची सेवा करणे हा या भागीदारीचा मुख्य उद्देश आहे", असे सांगितले. वाचा-फेसबुकचा Jio सोबत मोठा करार, 43 हजार 574 कोटींची गुंतवणूक मुख्य म्हणजे या भागीदारीत जिओ प्लॅटफॉर्म, रिलायन्स रिटेल आणि व्हॉट्सअ‍ॅपवरही करार होणार आहे. या अंतर्गत रिलायन्स रिटेलच्या व्यवसायाला वेग देण्याचा करार होईल. JioMart आणि WhatsApp मिळून भारतातील 3 कोटी किराणा दुकाने सक्षम करणार असल्याचेही यावेळी मुकेश अंबानी यांनी सांगितले. वाचा-रिलायन्स फाउंडेशनचे जगातील सर्वात मोठं मिशन, 3 कोटी लोकांना करणार अन्नदान 2016मध्ये रिलायन्स कंपनीने टेलिकॉम क्षेत्रात जिओ आणलं. जिओनं 4 वर्षांमध्ये प्रतिस्पर्धांना टक्कर देत टेलिकॉम क्षेत्रात आपलं वचर्स्व निर्माण केलं आहे. रिलान्सने टेलिकॉम ते होम ब्रॉडबॅण्डपर्यंत आपल्या सेवा विस्तारीत केल्या आहेत. भारतात फेसबुक आणि मेसेज अॅप आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी वापरलं जाणारं अॅप म्हणजे व्हॉटसअॅपचं मोठं मार्केट आहे. फेसबुकचे 400 मिलियन यूझर्स आहेत. 2020 मध्ये इंटरनेट यूझर्सची संख्या दुप्पट होण्याची अशा आहे. वाचा-रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देणार जादा वेतन डिजिटल इंडिया मिशन पूर्ण होईल रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न केल्याचे जिओ आणि फेसबुक करारावर सांगितले. दीर्घकालीन भागीदार म्हणून फेसबुकचे स्वागत आहे. डिजिटल इंडियाचे ध्येय जिओ आणि फेसबुकच्या कराराद्वारे पूर्ण होईल, असेही मुकेश अंबानी यावेळी म्हणाले. संपादन-प्रियांका गावडे
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या