मराठी बातम्या /बातम्या /मनी /जगातील प्रत्येक व्यक्तीवर आहे 31 लाखांचे कर्ज, रिपोर्टमध्ये खुलासा

जगातील प्रत्येक व्यक्तीवर आहे 31 लाखांचे कर्ज, रिपोर्टमध्ये खुलासा

कर्जाची ही रक्कम जागतिक GDP च्या अंदाजे 349% आहे. जगातील प्रत्येक व्यक्तीवर  37,500 डॉलर कर्ज आहे.

कर्जाची ही रक्कम जागतिक GDP च्या अंदाजे 349% आहे. जगातील प्रत्येक व्यक्तीवर 37,500 डॉलर कर्ज आहे.

कर्जाची ही रक्कम जागतिक GDP च्या अंदाजे 349% आहे. जगातील प्रत्येक व्यक्तीवर 37,500 डॉलर कर्ज आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 18 जानेवारी: कर्ज म्हटलं की, एक दडपण येतं. अनेक लोक कर्ज घेणे टाळतात. सध्याच्या काळात तर कर्ज घेणे महागले आहे. वाढती महागाई आणि अर्थव्यवस्थेतील कमकुवतपणा यामुळे लोकांवरचे कर्ज दिवसेंदिवस वाढत चाललंय. बँकांकडून सातत्याने व्याजदरामध्ये वाढ केली जातेय. आता संपूर्ण जगावर प्रचंड कर्ज झाल्याचे एका रिपोर्टमधून समोर आले आहे. या कर्जाने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. रिपोर्टनुसार जगातील प्रत्येक व्यक्तीवर जवळपास 31 लाखांचे कर्ज आहे.

संपूर्ण जगावर सुमारे 300 ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज आहे आहे. जर हे कर्ज प्रत्येक व्यक्तीमध्ये विभागले गेले तर ते 37500 डॉलरवर एवढे असेल. एका इंटरनॅशनल फाइनेंस इंस्टिट्यूटने अंदाज लावला आहे की, हे एकूण कर्ज जून 2022 मध्ये जगभरातील सरकारे, कुटुंबे आणि कॉर्पोरेशनवर थकलेले आहे. इंटरनॅशनल फायनान्स इंस्टिट्यूटच्या अंदाजानुसार कर्जाची ही रक्कम जागतिक GDP च्या सुमारे 349% आणि जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी 37,500 डॉलरच्या बरोबरीने आहे.

आता ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार जास्त व्याज, 'ही' बँक देतेय विशेष सुविधा!

 कर्जाची ही रक्कम जागतिक GDP च्या अंदाजे 349% आहे. जगातील प्रत्येक व्यक्तीवर 37,500 डॉलर कर्ज आहे. जागतिक आर्थिक संकटाच्या आधीच्या तुलनेत जगाचा फायदा खूप जास्त आहे. सरकारचे कर्ज-ते-जीडीपी गुणोत्तर 2022 पर्यंत 102% पर्यंत पोहोचले आहे.

...म्हणून वाढतेय कर्ज

शुक्रवारी एका अहवालात, S&P ग्लोबल रेटिंगसह टेरी चॅन आणि अलेक्झांड्रा दिमित्रीजेविक यांनी लिहिले की, 'महागाई, पायाभूत सुविधा आणि हवामानातील बदलांचा सामना करण्यासाठी कर्जाची जागतिक मागणी वाढतच आहे. तसेच वाढते व्याजदर आणि अर्थव्यवस्थेतील मंदी कर्जाचा बोजा वाढवत आहे.' 2022 मध्ये फेड फंड आणि युरोपियन सेंट्रल बँकेचे दर सरासरी 3 टक्क्यांनी वाढलेले दिसले. याचा अर्थ व्याज खर्चात 3 ट्रिलियन डॉलरची वाढ झाली आहे.

ट्रेनचं तिकीट हरवलंय तर नो टेंशन! 'या' पर्यायाचा करा वापर

कमी उत्पन्न गटातील लोक करत आहेत कर्जाचा सामना

रिपोर्टमध्ये म्हटले की, 2007 नंतर, प्रत्येक अतिरिक्त डॉलर कर्ज घेतल्याने अर्थव्यवस्थेत जोडलेले मूल्य कमी झाले आहे. म्हणजेच जास्त व्याजदर ज्यांची क्रेडिट रेटिंग आधीच कमी आहे अशा सरकार आणि कॉर्पोरेशन्सना नुकसान पोहोचवत आहेत. कमी उत्पन्न असलेले कुटुंब देखील क्रेडिट कार्ड, तारण आणि वाहन कर्जाच्या वाढत्या किमतीमुळे त्रस्त आहेत.

First published:

Tags: Business News, Gdp, Money debt