मुंबई, 18 जानेवारी: कॅनरा बँक आपल्या बँकिंग सेवांचा विस्तार करण्याच्या दिशेने सातत्याने पावले उचलत आहे. आता कॅनरा बँकेने गुंतवणूकदारांना अधिक नफा मिळविण्याची संधी देणारी नवीन टेन्यूरची टर्म डिपॉजिट स्कीम योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये सर्वाधिक 7.75 टक्के व्याजदर जाहीर केला आहे. 180 दिवसांपेक्षा जास्त कालावधीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकेने अतिरिक्त व्याजदर जाहीर केला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 7 डिसेंबर रोजी रेपो रेट 6.25 टक्के केला आहे. त्यानंतर बँका एफडी गुंतवणूक योजनांवर व्याजदर वाढवत आहेत. याचा सर्वाधिक फायदा वृद्ध गुंतवणूकदारांना होत आहे. वाढत्या व्याजदरामुळे आता तरुणाईही एफडी योजनेत गुंतवणूक करण्याकडे वळू लागली आहे. एफडीमध्ये गुंतवणूक केल्यावर, तुमचे पैसे बुडण्याची जोखीम शून्य राहते, तर नफा पूर्ण गॅरंटीसह उपलब्ध असतो.
ट्रेनचं तिकीट हरवलंय तर नो टेंशन! ‘या’ पर्यायाचा करा वापरकॅनरा बँकेने कोणते बदल केले?
- कॅनरा बँकेने 2 कोटींपेक्षा कमी गुंतवणुकीसाठी सर्व FD योजनांवरील व्याजदरांमध्ये सुधारणा केल्या आहेत.
- नवीन दर 18 जानेवारीपासून लागू करण्यात आले आहेत.
- बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत FD योजना चालवते आणि या योजनांवर 3.25 टक्के ते 7.75 टक्के व्याजदर देते.
- बँकेने प्रत्येक एफडी योजनेतील गुंतवणुकीवर ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त व्याजदर देण्याची घोषणा केली आहे
नॉन कॉलेबल टर्म डिपॉजिट स्कीम लॉन्च
यासह, बँकेने 400 दिवसांच्या कालावधीसह नॉन-कॉलेबल टर्म डिपॉजिट स्कीम देखील सुरू केली आहे. नॉन-कॉलेबल मुदत ठेव योजनेत 15 लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक करावी लागेल. या योजनेवर बँक नियमित ग्राहकांना 7.45 टक्के व्याज देत आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याज देण्याची घोषणा केली आहे. ककॅनरा बँकेने नॉन-कॉलेबल टर्म डिपॉजिट स्कीममध्ये प्रीमेच्योर विड्रॉलची परवानगी दिली नाही.