मुंबई, 18 नोव्हेंबर: तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वपूर्ण बातमी आहे. अनेकवेळा असे दिसून येते की प्रवासादरम्यान अनेक लोकांचे रेल्वेचे तिकीट हरवते किंवा फाटते, त्यामुळे लोकांना अडचणीचा सामना करावा लागतो. कारण त्यांच्याकडे पुरेशी माहिती नसते. तिकीट हरवलं म्हणजे आता ट्रेनमध्ये प्रवास करता येणार नाही, असं त्याला वाटतं. कारण विना तिकीट प्रवास केल्यास टीटीई पकडेल आणि फाइन घेईल अशी भीती त्यांना असते. मात्र तिकीट हरवलं तरीही टेंशन घेण्याची गरज नाही. याचा पर्याय म्हणून काही सुविधा उपलब्ध आहेत. ज्याच्या माध्यमातून तुमची ही समस्या दूर होऊ शकते.
तुमचे ट्रेनचे तिकीट हरवले किंवा फाटले तर, तुम्ही सर्वप्रथम डुप्लिकेट तिकीट बनवावे. ते सहज तयार केले जाते. कारण ही परिस्थिती कुणासोबतही उद्भवू शकते हे भारतीय रेल्वेलाही समजते. ही एक सामान्य चूक आहे. अशा परिस्थितीत तुमचे तिकीट हरवले किंवा कुठेतरी राहून गेले तर तुम्ही रेल्वे काउंटरवर जाऊन डुप्लिकेट तिकीट काढू शकता. यासाठी तुम्हाला काही शुल्क द्यावे लागेल.
होम लोनची परतफेड करताना कोणता पर्याय ठरेल फायद्याचा? जाणून घ्या
डुप्लिकेट तिकिटांसाठी, तुम्ही भारतीय रेल्वेच्या वेबसाइट indianrail.gov.in वर जाऊन माहिती मिळवू शकता. तुम्हाला सेकंड आणि स्लीपर क्लासचे डुप्लिकेट तिकीट 50 रुपयांना मिळेल. तर, जर तुम्ही उर्वरित द्वितीय श्रेणीसाठी डुप्लिकेट तिकीट घेतले तर तुम्हाला 100 रुपये मोजावे लागतील. आरक्षण चार्ट तयार झाल्यानंतर कन्फर्म केलेले तिकीट हरवल्याची नोंद झाल्यास, भाड्याच्या 50% वसुलीवर डुप्लिकेट तिकीट जारी केले जाते.
Cash transaction rules : पैशांचा व्यवहार करताना कधी लागतो दंड? नेमका काय आहे नियम
जर तुमच्याकडे प्लॅटफॉर्म तिकीट असेल आणि काही कारणास्तव तुम्हाला ट्रेनने प्रवास करावा लागत असेल तर हे तिकीट तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. अशा परिस्थितीत, ट्रेनमध्ये चालत असणाऱ्या टीटीईशी संपर्क साधा आणि तुम्हाला जिथे प्रवास करायचा आहे त्या ठिकाणचे तिकीट देण्याची विनंती करा. अशा परिस्थितीत, टीटीई तिकिटाच्या भाड्यासह ठराविक दंड घेऊन तुम्हाला तिकीट देऊ शकतो. प्लॅटफॉर्म तिकिटाच्या आधारावर, टीटीई त्याच स्टेशनवरून तिकीट बनवेल जिथे तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट घेतले आहे. अन्यथा, TTE ट्रेनच्या संपूर्ण प्रवासासाठी तिकीट काढतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian railway, IRCTC, Train