• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • बदलत आहे PF खात्याशी संबंधित हा नियम! आता या एका कारणामुळे नाही काढता येणार पैसे

बदलत आहे PF खात्याशी संबंधित हा नियम! आता या एका कारणामुळे नाही काढता येणार पैसे

Link Aadhar Card with PF account: तुमचं देखील ईपीएफ खातं असेल तर बदल होणाऱ्या या नियमाबाबत तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. अन्यथा तुम्ही केलेल्या विड्रॉल क्लेममध्ये किंवा पैसे काढताना समस्या येऊ शकतात. हा महत्त्वाचा नियम म्हणचे तुमचं आधार कार्ड ईपीएख खात्याशी लिंक करणं.

  • Share this:
    नवी दिल्ली, 09जुलै: तुमचं देखील ईपीएफ खातं असेल तर बदल होणाऱ्या या नियमाबाबत तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. अन्यथा तुम्ही केलेल्या विड्रॉल क्लेममध्ये किंवा पैसे काढताना समस्या येऊ शकतात. हा महत्त्वाचा नियम म्हणचे तुमचं आधार कार्ड ईपीएख खात्याशी लिंक करणं. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (Employees Provident Fund EPF) सदस्यांना त्यांच्या पीएफ खात्याशी आधार कार्ड (Aadhar Card) लिंक करणं अनिवार्य आहे. दरम्यान आधार कार्ड आणि पीएफ खातं लिंक करण्याची तारीख (Deadline to link Aadhar Card with epf Account) आता 1 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. याआधी ही तारीख 1 जून होती. EPFO ने ही डेडलाइन तीन महिन्यांनी वाढवली, देशभरातील कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तुमचा आधार क्रमांक यूएएनशी लिंक नसेल तर सब्सक्रायबर्सच्या खात्यात एम्प्लॉयरचे योगदान थांबवले जाऊ शकते. सब्सक्रायबर्सचे UAN  (Universal account number) आधारसह लिंक असणं आवश्यक आहे. EPFO ने Social Security code 2020 च्या सेक्शन 142 मध्ये बदल केला आहे. यामुळे ECR फाइलिंग प्रोटोकॉल बदलला आहे. आता ही डेडलाइन 1 सप्टेंबर 2021 करण्यात आली आहे. हे वाचा-PF संदर्भात नवी सेवा, पीएफ खात्यातून एका तासात आगाऊ काढता येतील 1 लाख रुपये एमव्ही किनी या लॉ फर्ममध्ये पार्टनर असणाऱ्या विधीशा क्रिष्णन यांनी अशी माहिती दिली आहे की, PAN आणि आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी, पीपीएफ खात्याशी आणि ईपीएफ खात्याशी लिंक करणं हे केवायसी करण्यासाठी बेसिक आवश्यकता आहे. तसं न केल्यास तुमचे विड्रॉल क्लेम देखील नाकारले जाऊ शकतात, शिवाय इतर काही समस्या येऊ शकतात. 'सामाजिक सुरक्षा संहिता, 2020 (The Code on Social Security, 2020) हा संघटित/असंघटित किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील सर्व कर्मचारी आणि कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्याच्या उद्देशाने सामाजिक सुरक्षेसंदर्भातील कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठीचा कायदा आहे. ही संहिता अद्याप लागू केलेली नसली तरी कामगार व रोजगार मंत्रालयाने 3 जून रोजी या कोडमधील कलम 142 ला अधिसूचित केले आहे. ज्यामध्ये त्यांना आधार क्रमांक देणं अनिवार्य असल्याचं म्हटलं आहे, जे कर्मचारी आणि असंघटित क्षेत्रातील कामगार कोणत्याही स्कीमअंतर्गत एखादा लाभ किंवा पेमेंट मिळवत आहेत', L&L Partners च्या अमृता टोंक यांनी ही माहिती दिली आहे. हे वाचा-SBI च्या या खातेधारकांना 30 लाखांपर्यंत मिळेल लाभ, आहेत हे 5 बंपर फायदे आधारशी तुमचे UAN कसं जोडाल? -सर्वात आधी EPFO च्या अधिकृत वेबसाइटवर जा -याकरता https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ यावर क्लिक करू शकता. -यानंतर UAN आणि पासवर्ड प्रविष्ट करुन लॉग इन करा -त्यानंतर Manage सेक्शनमध्ये KYC या पर्यायावर क्लिक करा -याठिकाणी तुम्हाला EPF अकाउंटमध्ये आधारसह कोणती कागदपत्र जोडणं आवश्यक आहे ते दिसेल -याठिकाणी आधारचा पर्याय निवडून आधार नंबर आणि आधारवरील तुमचं नाव टाइप करुन सर्व्हिसवर क्लिक करा -यानंतर तुम्ही दिलेली माहिती सुरक्षित होईल आणि तुमचं आधार UIDAI डेटाशी व्हेरिफाय होईल -तुम्ही दिलेली कागदपत्र योग्य असल्यास तुमचं आधार EPF खात्याशी लिंक होईल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: