जाहिरात
मराठी बातम्या / मनी / 60 लाख पेन्शनधारकांसाठी खूशखबर! दिवाळीआधी दुप्पट पेन्शन देण्याच्या विचारात सरकार

60 लाख पेन्शनधारकांसाठी खूशखबर! दिवाळीआधी दुप्पट पेन्शन देण्याच्या विचारात सरकार

60 लाख पेन्शनधारकांसाठी खूशखबर! दिवाळीआधी दुप्पट पेन्शन देण्याच्या विचारात सरकार

कामगार मंत्रालयाच्या कमीतकमी पेन्शन वाढवण्याच्या प्रस्तावाशी अर्थ मंत्रालय देखील सहमत झाले आहे. दिवाळीआधी याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 06 नोव्हेंबर: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत (EPFO) येणाऱ्या संघटित क्षेत्रातील कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना EPF (Employee Provident Fund) चा लाभ उपलब्ध करून द्यायचा असतो. यामध्ये कंपनी आणि कर्मचारी दोघांकडून योगदान केले जाते. यामध्ये कर्मचाऱ्याच्या बेसिक सॅलरी+डीए चे 12% योगदान असते. तर कंपनीच्या 12% योगदानातील 8.33 टक्के योगदान EPS मध्ये जाते. दरम्यान, CNBC आवाजला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार EPFO पेन्शनर्सना दिवाळीआधी चांगली भेट मिळण्याची शक्यता आहे.  कामगार मंत्रालयाच्या कमीतकमी पेन्शन वाढवण्याच्या प्रस्तावाशी अर्थ मंत्रालय देखील सहमत झाले आहे. दिवाळीआधी याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. दोन्ही मंत्रालयांमध्ये सहमती झाल्याने मिनिमम पेन्शन दुप्पट होण्याच्या प्रस्तावावर लवकरच मंजूरी मिळू शकते. दुप्पट होईल पेन्शन (हे वाचा- दिवाळीला खरेदी करू शकता सोन्याचे दागिने! हे प्रसिद्ध ज्वेलर्स देत आहेत खास ऑफर्स) सूत्रांच्या माहितीनुसार मिनिमम पेन्शन 1000 रुपयांवरून वाढून 2000 रुपये केली जाऊ शकते. याबाबत सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (CBT-Central Board of Trustees) कडून 2019 मध्ये मंजूरी मिळाली होती. आता सीबीटीची मागणी अशी आहे की, ही मिनिमम पेन्शन 2000-3000 केली जावी. पेन्शन दुप्पट केल्यानंतर सरकारी तिजोरीवर 2000 ते 2500 कोटींचा अतिरिक्त भार पडेल, पण या वाढीमुळे जवळपास 60 लाख पेन्शनर्सचा फायदा होईल. (हे वाचा- दिवाळीआधी लखपती बनण्याची सुवर्णसंधी! ‘ही’ नोट बनवेल तुम्हाला श्रीमंत) खाजगी संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मासिक पेन्शनचा लाभ मिळावा याकरता एम्प्लॉयी पेन्शन स्कीम, 1995 (EPS) ची सुरुवात करण्यात आली होती. EPS स्कीम, 1952 अंतर्गत कंपनी नियोक्ताकडून EPF मध्ये जाणाऱ्या 12 टक्के योगदानापैक 8.33 टक्के ईपीएसमध्ये जाते.  वयाच्या 58 व्या वर्षानंतर कर्मचारी EPS मधून मासिक निवृत्तीवेतनाचा फायदा घेऊ शकतात. नोकरी गेल्यानंतर ईपीएफ खात्यातून पैसे काढले तर काय होईल? ईपीएफ स्कीमअंतर्गत, नोकरी गेल्यानंतर त्या सदस्यास पूर्ण रक्कम काढून खाते बंद करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. खाते बंद करतेवेळी (2 महिन्यांसाठी बेरोजगा राहिल्यास) ईपीएफ आणि ईपीएफ खात्यातून (अट अशी आहे की तुमची सेवा 10 वर्षांपेक्षा कमी असली पाहिजे) एकरकमी पूर्ण रक्कम काढता येऊ शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात