दिवाळीआधी लखपती बनण्याची सुवर्णसंधी! 'ही' नोट बनवेल तुम्हाला श्रीमंत

ही नोट तुम्ही ऑनलाइन सुरू असलेल्या लिलावात विकून 1 लाखांपर्यंत रक्कम मिळवू शकता. यावेळी बोली लावताना तुम्ही मोलभाव देखील करू शकता

ही नोट तुम्ही ऑनलाइन सुरू असलेल्या लिलावात विकून 1 लाखांपर्यंत रक्कम मिळवू शकता. यावेळी बोली लावताना तुम्ही मोलभाव देखील करू शकता

  • Share this:
    नवी दिल्ली, 05 नोव्हेंबर: दिवाळीआधी घरबसल्या लखपती बनण्याची संधी तुम्हाला मिळेल आणि याकरता तुम्हाला विशेष काही करण्याची गरज नाही. जर तुमच्याकडे जुनी एक रुपयाची नोट आहे तर तुम्हाला एक लाखापर्यंत रक्कम मिळू शकते. तुम्हाला या नोटेचा फोटो इंडियामार्टच्या वेबसाइटवर पोस्ट करावा लागेल, ज्याठिकाणी त्यावर बोली लावली जाईल. तुम्हाला चांगली बोली देणाऱ्या व्यक्तीला ही नोट विकता येईल. जाणून घ्या कोणती नोट याकरता लागेल आणि तुम्ही कशी कमाई करू शकता. ही खास एक रुपयाची नोट ऑक्शनमध्ये विकून तुम्हाला एक लाखापर्यंतची रक्कम कमावता येईल. लावण्यात येणाऱ्या बोली दरम्यान तुम्ही मोलभाव देखील करू शकता. इंडियामार्टवर ही विक्री करता येईल. कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही ही कमाई करू शकता. भारत सरकारकडून जारी केल्या जातात या खास नोटा एक रुपयाची नोट वेगळी असते याकरता कारण इतर नोटांप्रमाणे या नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नव्हे तर भारत सरकार जारी करते. यामुळे एक रुपयांच्या या नोटांवर आरबीआय गव्हर्नर यांचे हस्ताक्षर नसते. एक रुपयांच्या नोटेवर वित्त सचिवाचे हस्ताक्षर असते. 30 नोव्हेंबर 1917 मध्ये पहिल्यांदा या नोटा छापण्यात आल्या होत्या. त्यावेळी या नोटांवर जॉर्ज पंचम यांचा फोटो होता. (हे वाचा-US Election 2020 च्या निकालाच्या प्रतीक्षेदरम्यान घसरलं सोनं, हे आहेत नवे दर) रिझर्व्ह बँकेच्या वेबसाइटनुसार 1926 मध्ये पहिल्यांदा या नोटांची छपाई बंद झाली. 1940 मध्ये ती पुन्हा सुरू करण्यात आली. 1994 मध्ये एक रुपयाच्या नोटेची छपाई पुन्हा एकदा बंद करण्यात आली. 2015 मध्ये पुन्हा एकदा या नोटा छापण्याची सुरुवात करण्यात आली होती. याबाबत अधिक माहिती तुम्हाला https://dir.indiamart.com/impcat/antique-note.html या वेबसाइटवरून मिळू शकेल. ही नाणी विकूनही होईल कमाई इंडिया मार्ट वेबसाईटवर होणाऱ्या जुन्या नाण्यांच्या आणि नोटांच्या लिलावामध्ये तुम्ही 5 किंवा 10 रुपयांची नाणी विकू शकता. मात्र या नाण्यांवर वैष्णो देवी असायला हवी.  वैष्णौ देवी असणारी नाणी 2002 साली जारी करण्यात आली आहेत. देवी असल्याने या नाण्यांना लोक नशीबवान मानतात आणि त्यामुळे या नाण्यांसाठी लोक लाखो रुपये खर्च करत आहेत. याव्यतिरिक्तही काही नोटा आणि नाणी आहेत, ज्या विकून तुम्ही कमाई करू शकता. या वेबसाईटवर करू शकता नोटांची विक्री- https://dir.indiamart.com/impcat/old-coins.html (हे वाचा-पेन्शनधारकांसाठी अलर्ट! 31 डिसेंबरपूर्वी हे काम न केल्यास थांबेल तुमचे पेन्शन) https://in.pinterest.com/080841052o/sell-old-coins/ http://www.indiancurrencies.com/
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: