नवी दिल्ली, 05 नोव्हेंबर: यावर्षी सोन्याचे दर (Gold Price) आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचले आहेत. दरम्यान दर जास्त असले तरीही याहीवर्षी सणासुदीच्या काळात सोन्याच्या दागिन्यांची (Gold Jewellery) चांगली विक्री होईल असा विश्वास सराफांकडून व्यक्त केला जात आहे. त्यातच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी देशातील प्रसिद्ध ज्वेलर्सकडून काही खास ऑफर देखील दिल्या जात आहेत. विशेष म्हणजे या ऑफर्सना चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार गेल्यावर्षीच्या तुलनेत सोन्याचे दर 30 टक्केने वाढले आहेत. अशावेळी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही वेगळ्या ऑफर्सची आवश्यकता आहे. मालाबार गोल्ड अँड डायमंड्सने देशभरातील विविध ठिकाणांच्या त्यांच्या स्टोअर्समध्ये सोन्याची किंमत सारखी ठेवली आहे. TBZ ने देशभरात घडणावळीसाठी 199 रुपये फ्लॅट शुल्क आकारण्याचे जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे जुन्या दागिन्यांच्या एक्सचेंजवर 100 टक्के मुल्य देण्याची ऑफरही त्यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे तनिष्क पहिल्यांदाच कलेक्शन रेंजवर डिस्काउंट ऑफर देत आहे. ग्राहक याठिकाणी सोन्याच्या दागिन्यांवर 25 टक्के तर हिऱ्याच्या दागिन्यांवर 20 टक्के सवलतीचा फायदा घेऊ शकतात.
(हे वाचा-डाळींच्या किंमती घसरल्या, 20 टक्क्यांपर्यंत झाल्या स्वस्त)
ज्वेलर्सचे असे म्हणणे आहे की, किंमती जास्त असल्यामुळे फेस्टिव्ह सीझनमध्ये व्हॉल्यूम कमी असेल मात्र मागणी कमी होणार नाही. ग्राहकांच्या बजेटमध्ये बसणारे दागिने देण्यासाठी सेन्को ज्वेलर्सने 14 आणि 18 कॅरेटची नवीन रेंज बाजारात आणली आहे. सराफांच्या अनुभवानुसार यावर्षी दागिन्यांच्या प्रीबुकिंगमध्ये 30 टक्के वाढ झाली आहे.
या सणासुदीच्या काळात यावर्षी जड किंवा जास्त किंमतीच्या दागिन्यांची मागणी कमी आहे, मात्र लाइट वेट दागिन्यांची मागणी चांगली आहे. मंगळसूत्र, अंगठ्या, कानातले दागिने यांची मागणी वाढली आहे. हिऱ्यांच्या दागिन्यांची मागणी देखील वाढली आहे. लग्नासाठी लागणाऱ्या दागिन्यांची मागणी सध्या कमी आहे.
(हे वाचा-पेन्शनधारकांसाठी अलर्ट! 31 डिसेंबरपूर्वी हे काम न केल्यास थांबेल तुमचे पेन्शन)
सोन्याच्या दागिन्यांमध्ये जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये कमी मागणी पाहायला मिळाली. या काळात सोन्याची मागणी 30 टक्के तर दागिन्यांची मागणी 48 टक्केने कमी झाली आहे. इनव्हेस्टमेंट कमोडिटी व्यतिरिक्त धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्याची सेंटिमेंटल बाइंग अधिक होते. अशावेळी आकर्षक ऑफर देऊन ज्वेलर्स वाढणाऱ्या किंमतींचा परिणाम कमी करू इच्छित आहेत.