Home /News /money /

Tax Saving : ELSS मध्ये गुंतवणूक करून किती वाचवता येईल टॅक्स? वाचा काय आहे कॅलक्यूलेशन

Tax Saving : ELSS मध्ये गुंतवणूक करून किती वाचवता येईल टॅक्स? वाचा काय आहे कॅलक्यूलेशन

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक (ELSS Investment) केल्यास टॅक्स वाचवता (Tax Saving) येतो, हे तुम्हाला माहिती आहे का? बरेच लोक याला टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड (Mutual Fund) असंही म्हणतात. जाणून घ्या यात तुम्हाला किती टॅक्स वाचवता येईल

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 20 जानेवारी: इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक (ELSS Investment) केल्यास टॅक्स वाचवता (Tax Saving) येतो, हे तुम्हाला माहिती आहे का? बरेच लोक याला टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड (Mutual Fund) असंही म्हणतात. यामध्ये तीन वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो त्यामुळं तीन वर्षांच्या काळात या स्कीममधून पैसे काढता येत नाही. ईएलएसएसमधील गुंतवणूक इनकम टॅक्स कायद्यामधील कलम (Income Tax Act) 80C अंतर्गत टॅक्स बेनिफिट मिळवून देते. 80C मध्ये, एका आर्थिक वर्षात (Financial Year) जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंतची टॅक्स सवलत उपलब्ध आहे. तुम्ही ईएलएसएसमध्ये गुंतवलेली बहुतांश रक्कम म्युच्युअल फंड कंपनी शेअर मार्केटमध्ये (Share Market Investment) लावते. यामुळे टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिटच्या तुलनेत यामध्ये अस्थिरता आणि जोखीम जास्त असते. टॅक्स सेव्हिंग एफडीच्या (Tax Saving FD) बाबतीत, तुम्हाला किती रिटर्न मिळेल हे गुंतवणुकीच्या वेळी कळते. परंतु ईएलएसएसमधील प्रत्यक्ष रिटर्नचा अंदाज बांधणं कठीण आहे. कारण, त्याची कामगिरी शेअर मार्केटशी जोडलेली असते. ईएलएसएसमध्ये गुंतवणूक करताना खालील गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. हे वाचा-Gold Price Today: सोनंचांदी महागली की आज उतरली झळाळी? इथे तपासा लेटेस्ट भाव एकरकमी गुंतवणूक करू नका ईएलएसएस म्युच्युअल फंड स्कीम्समध्ये एसआयपी (SIP) किंवा एकरकमी गुंतवणूक करता येते. मात्र, ईएलएसएस स्टॉक मार्केटशी संबंधित असल्यामुळं त्यामध्ये एकरकमी गुंतवणूक न करण्याचा सल्ला इन्व्हेस्टमेंट व टॅक्स अॅडव्हायजर (Investment and Tax Advisor) बलवंत जैन यांनी दिला आहे. या उलट तुम्ही दर महिन्याला एसआयपीद्वारे गुंतवणूक करा. त्यामध्ये जोखीम कमी असते. फंड हाऊसेससुद्धा लोकांना ईएलएसएसमध्ये किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करण्याचा सल्ला देतात. जास्तीत जास्त 46 हजार 800 रुपयांची होऊ शकते बचत बलवंत जैन स्पष्ट करतात की, टॅक्स सेव्हिंग फंडामध्ये गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही. परंतु, तुम्ही 80C अंतर्गत एका आर्थिक वर्षात केवळ 1.5 लाख रुपयांपर्यंतच डिडक्शन क्लेम (Deduction claim) करू शकता. ईएलएसएसमध्ये गुंतवणूक करून तुम्ही एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 48 हजार 600 रुपये टॅक्स वाचवू शकता. समजा तुम्ही एका आर्थिक वर्षात ईएलएसएसमध्ये 1.5 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 30 टक्क्यांच्या हाय टॅक्स स्लॅबनुसार (High tax slab) 45 हजार रुपयांचं टॅक्स बेनिफिट (Tax benefit) मिळेल. याशिवाय, चार टक्के सेस म्हणजेच एक हजार 800 रुपयांची आणखी बचत होईल. अशा प्रकारे तुम्ही ईएलएसएसमध्ये गुंतवणूक करून एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 46 हजार 800 रुपये वाचवू शकता. हे वाचा-SBI च्या ग्राहकांसाठी खूशखबर! आता फसवून कुणी काढू शकत नाही तुमच्या ATM मधून पैसे …तर 10 वर्षांत होऊ शकतो इतक्या लाख रुपयांचा फंड बलवंत जैन म्हणतात, ईएलएसएस शेअर मार्केटशी जोडलेलं आहे. त्यामुळे रिटर्नचा अंदाज लागणं कठीण आहे. पण, ईएलएसएसमधील गुंतवणुकीवर दरवर्षी सरासरी 12 टक्के परतावा मिळतो, असं मानलं जातं. म्हणजे जर तुम्ही ईएलएसएसमध्ये एक लाख रुपये ठेवले तर 12 टक्के रिटर्ननुसार तुम्ही 10 वर्षांत 3 लाख 10 हजार 584 रुपये 82 पैसे इतक्या रकमेचे मालक होऊ शकता. मुदतपूर्तीवर पैसे काढल्यास लागतो टॅक्स ईएलएसएसमधील लॉक-इन पीरियड संपल्यानंतर तुम्ही स्कीममधून पैसे काढल्यास, त्यावर टॅक्स आकारला जातो. सध्याच्या कर नियमांनुसार, इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये (Equity Mutual Fund) एका वर्षापेक्षा जास्त काळ गुंतवलेल्या पैशावर लॉन्‍ग टर्म कॅपीटल गेन्स टॅक्‍स आकारला जातो. जर एका आर्थिक वर्षात ईएलएसएस म्युच्युअल फंडाचा नफा एक लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर इंडेक्सेशन बेनिफिटशिवाय (Indexation Benefit) 10 टक्के दराने टॅक्स आकारला जातो. हे वाचा-चुकून दुसऱ्याच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झाले तर काय करावं? अशी करू शकता गुंतवणूक >> ईएलएसएसमध्ये गुंतवणूक करण्यासाठी केवायसी गरजेची आहे. >> फंड हाऊसच्या ब्राँच ऑफिसमध्ये किंवा रजिस्ट्रार ऑफिसमध्ये चेकसह फॉर्म भरावा लागेल. फंड हाऊसच्या वेबसाइटद्वारे किंवा एग्रीगेटर्सद्वारे कोणीही ईएलएसएसमध्ये ऑनलाइन गुंतवणूक करू शकतं. >> गुंतवणूक सुरू झाल्यानंतर एक फोलिओ क्रमांक दिला जातो. ज्याच्या मदतीने तुम्ही भविष्यात केव्हाही ईएलएसएस स्कीम्समध्ये गुंतवणूक करू शकता. >> ईएलएसएस म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराला ग्रोथ, डेव्हिडंट (Dividends) आणि डेव्हिडंट रिइन्व्हेस्टमेंट ऑप्‍शन (Dividend reinvestment option) मिळतात. >> ग्रोथ ऑप्शनमध्ये गुंतवणूकदाराला डेव्हिडंट दिला जात नाही. स्कीमची पूर्तता करताना किंवा त्यातून स्विच करताना लाभ किंवा तोटा उपलब्ध असतो. >> डेव्हिडंट ऑप्शनमध्ये, गुंतवणूकदारांना डेव्हिडंट दिला जातो. मात्र, डेव्हिडंट घोषणा पूर्णपणे फंड हाऊसवर अवलंबून असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे डेव्हिडंट करपात्र असतो. >> डेव्हिडंट रिइन्व्हेस्टमेंट ऑप्‍शनमध्ये फंड हाउस ज्या डेव्हिडंटची घोषणा करते, तो पुन्हा स्कीममध्ये गुंतवता येतो. >> डेव्हिडंट रिइन्व्हेस्टमेंटलाही लॉक-इन पीरियड असतो.
First published:

Tags: Income tax, Tax, Tax benifits

पुढील बातम्या