Home /News /money /

SBI च्या ग्राहकांसाठी खूशखबर! आता फसवून कुणीही काढू शकत नाही तुमच्या ATM मधून पैसे

SBI च्या ग्राहकांसाठी खूशखबर! आता फसवून कुणीही काढू शकत नाही तुमच्या ATM मधून पैसे

अनेकदा एटीएम कार्ड क्लोन करून किंवा अन्य मार्गाने फसवणूक करून एटीएममधून पैसे काढले जात असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं; पण आता असं होणार नाही. कारण, एसबीआयने ग्राहकांच्या सुरक्षेसाठी (Customer Safety) आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

पुढे वाचा ...
मुंबई, 19 जानेवारी: स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) ही देशातली सर्वांत मोठी बँक आहे. तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी ही खूप महत्त्वाची माहिती आहे. सध्या सायबर क्राइमचं (Cuber Crime in India) प्रमाण वाढलं आहे. अनेकदा एटीएम कार्ड क्लोन करून किंवा अन्य मार्गाने फसवणूक करून एटीएममधून पैसे काढले जात असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं; पण आता असं होणार नाही. कारण, एसबीआयने ग्राहकांच्या सुरक्षेसाठी (Customer Safety) आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. एटीएममधून रोख पैसे काढण्याच्या प्रक्रियेत एसबीआयकडून सुधारणा करण्यात आली आहे. SBIच्या एटीएम मशीनमधून रोख पैसे काढताना आता तुम्हाला ओटीपी अर्थात वन टाइम पासवर्ड टाकावा लागणार आहे. हा ओटीपी तुम्हाला बँकेतल्या तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर (OTP on Registered Mobile Number) मिळेल आणि तुमच्या एटीएम पिननंतर तो टाकणं आवश्यक असणार आहे. तुम्ही हा OTP टाकला नाही, तर तुम्ही पैसे काढू शकणार नाही. एखाद्या व्यक्तीने तुमच्या कार्डमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला तर ती व्यक्ती तुमच्या परवानगीशिवाय पैसे काढू शकणार नाही. कारण आता तुमच्या मोबाइल नंबरवर येणारा OTP यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. हे वाचा-पगारधारकांना Budget 2022 मध्ये मिळणार गिफ्ट? अशा आहेत या वर्गाच्या अपेक्षा स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank Of India) आणलेल्या या उपायामुळे ग्राहकांना कडक सुरक्षा मिळेल. एटीएम वापरणं आता पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित झालं आहे. एटीएममधून रोख रक्कम काढण्याबाबतच्या सुरक्षेत एक नवीन स्तर वाढवल्याचं स्टेट बँक ऑफ इंडियानं म्हटलं आहे. हे फीचर फक्त आणि फक्त SBI ATM मशीनमधून पैसे काढतानाच काम करेल. तुम्ही SBI चे ग्राहक असाल आणि इतर कोणत्याही बँकेच्या ATM मधून पैसे काढण्याचा प्रयत्न करत असाल, तर हे फीचर काम करणार नाही. याचा अर्थ असा की तुम्ही इतर कोणत्याही बँकेच्या ATM मधून पैसे काढले तर तुम्हाला OTP टाकण्याची गरज पडणार नाही. हे नवीन फीचर नॅशनल स्विचकडून (NFS) विकसित करण्यात आलं आहे. हे देशातलं सर्वांत मोठे इंटरऑपरेबल एटीएम नेटवर्क आहे. ते देशांतर्गत बँक एटीएम व्यवहारांपैकी 95 टक्क्यांहून अधिक व्यवहार हाताळतं. हे वाचा-Exchange : 50 ते 2000 रुपयांच्या फाटलेल्या नोटांच्या बदल्यात बँक देते इतके पैसे हे फीचर वापरण्याच्या काय आहेत स्टेप्स >> यासाठी सर्वप्रथम तुम्हाला SBIच्या ATM मध्ये जावं लागेल. >> पहिल्याप्रमाणेच पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. >> यानंतर तुमच्या नंबरवर एक OTP येईल. >> मोबाइल नंबरवर आलेला OTP हा एटीएम मशीनच्या स्क्रीनवरच्या बॉक्समध्ये टाकावा. >> यानंतर तुम्ही पैसे काढू शकाल.
First published:

पुढील बातम्या