नवी दिल्ली, 20 जानेवारी: आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंज (Gold Rate on MCX) वर सोन्याच्या किंमतीत (Gold price today) 0.01 टक्क्यांनी किंचित वाढ झाली आहे. तर, चांदीचा भाव (Silver price today) 0.14 टक्क्यांनी वाढला. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होतोय. त्यामुळे सोन्याने 10 ग्रॅमसाठी 48000 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. महाराष्ट्रात 10 ग्रॅम सोन्याचा म्हणजेच एक तोळ्याचा दर 49200 रुपये आहे. लग्नसराईमुळे सोने महागण्याची शक्यता देशात लग्नसराईच्या काळात सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. मागणी वाढल्यामुळे सोन्या-चांदीच्या किंमती देखील (Gold Silver Price Update) वाढू शकतात. सोने पुन्हा एकदा हळूहळू प्रति तोळा 50,000 रुपये होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. सोन्या-चांदीचा आजचा दर सोन्याच्या किमतीत 0.01 टक्क्यांनी किरकोळ वाढ झाल्याने आज सोन्याचा दर प्रति तोळा 48,381 रुपये आहे. महाराष्ट्रात सोन्याचा आजचा दर (Gold Rate in Maharashtra) प्रति तोळा 49200 आहे. तर, आज चांदीचा दरात 0.14 टक्क्यांनी वाढ झाल्याने आजचा एक किलो चांदीचा दर 64,495 रुपये आहे. हे वाचा- चुकून दुसऱ्याच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झाले तर काय करावं? मिस्ड कॉलवर मिळवा माहिती सोन्याचा आजचा दर काय आहे, याची माहिती तुम्ही घरबसल्या सुद्धा सहज मिळवू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल, त्यानंतर तुमच्या फोनवर एक एसएमएस येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचा सध्याचा दर पाहू शकता. अशाप्रकारे तपासा सोन्याची शुद्धता तुम्हाला सोन्याची शुद्धता (Gold Purity) तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे (BIS Care app) ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतही तत्काळ माहिती मिळते. हे वाचा- Paytm Share 990 रुपयांच्या नीचांकी पातळीवर; गुंतवणूकदारांना मोठा झटका! लग्नसराई सुरू झाली आहे. त्यामुळे आता सोन्याच्या खरेदीला ग्राहकांचा प्रतिसाद वाढत आहे. अद्याप सोन्याचे दर हे 50000 रुपयांच्या आत आहे. हे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे ज्यांच्या लग्नासाठी अद्याप दोन ते तीन महिने बाकी आहेत, त्यांच्याकडूनही आताच सोने खरेदीची लगबग सुरू झाल्याचे चित्र बाजारात दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.