मुंबई : ट्विटरसोबत करार करून एलन मस्क यांच्या डोक्याचा ताप जास्त वाढला आहे. 12 तास काम करूनही एलन मस्क यांना शांतता मिळत नाही. त्यांची अक्षरश: झोप उडाली आहे. एलन मस्क यांना दुसरा दणका मिळाला आहे. त्यांना
एलन मस्क यांनी सोशल मीडियातील दिग्गज ट्विटरला 44 अब्ज डॉलरमध्ये विकत घेतल्यानंतर त्यांची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे 3.95 अब्ज डॉलरचे शेअर्स विकण्याची वेळ आली आहे. मस्क यांनी टेस्लाचे एकूण 19.5 दशलक्ष शेअर्स विकले, ज्याची एकूण किंमत साधारण 3.95 अब्ज डॉलर्स आहे, असं अमेरिकन एक्सचेंज फायलिंगने म्हटले आहे.
मस्क यांनी नुकतेच ट्विटरशी करार केल्यानंतर अचानक शेअर्स विकले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांनाा उधाण आलं आहे. एलन मस्क यांची ही पहिलीच वेळ नाही. याआधी एप्रिलमध्ये 8 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आणि ऑगस्टमध्ये 7 अब्ज डॉलर्सचे शेअर्स त्यांनी विकले आहेत.
भारतात Blue Tick साठी ट्विटर कधीपासून पैसे आकारणार? इलॉन मस्कने दिलं उत्तर
Elon Musk's net worth dropped below $200 billion as investors dumped Tesla Inc (TSLA.O) shares on fears the top executive and largest shareholder of the world's most valuable electric-vehicle maker is more preoccupied with Twitter, reports Reuters pic.twitter.com/Aas4wz6c5L
— ANI (@ANI) November 9, 2022
Twitter is the worst! But also the best.
— Elon Musk (@elonmusk) November 8, 2022
ट्विटर सध्या अमेरिकेच्या शेअर्ससाठी लिस्टेड आहे आणि मस्क यांचा ट्विटरला खासगी कंपनी करण्याचा मानस आहे. ट्विटर विकत घेण्याआधी त्यांनी तसे संकेतही दिले होते. गेल्या अनेक दिवसांत ट्विटरमध्ये मोठे बदल घडत आहेत.
ट्विटरमधून रातोरात कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली. 7 दिवसांचा आठवडा आणि १२ तास काम अशी मोहीम राबवण्यात आली. एवढं सगळं करूनही एलन मस्क मात्र शांत झोपू शकले नाहीत. ट्विटर करारानंतर त्यांच्या संपत्तीमध्ये देखील मोठी घट झाली आहे. शेअर विकण्यामागचं कारण अद्याप समोर आलं नाही. मात्र यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Elon musk, Share market, Twitter, Twitter account