जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / भारतात Blue Tick साठी ट्विटर कधीपासून पैसे आकारणार? इलॉन मस्कने दिलं उत्तर

भारतात Blue Tick साठी ट्विटर कधीपासून पैसे आकारणार? इलॉन मस्कने दिलं उत्तर

इलॉन मस्क

इलॉन मस्क

इलॉन मस्कने या आठवड्यात या नवीन ब्लू टिक व्हेरीफिकेशनसाठी8 डॉलरची योजना जाहीर केली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 6 नोव्हेंबर : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर खरेदी केल्यापासून इलॉन मस्कने अनेक बदल करायला सुरुवात केली आहे. यातील महत्त्वाचा बदल म्हणजे यापुढे ब्लू टिकसाठी 8 डॉलर मोजावे लागणार आहे. टेस्लाचे सीईओ आणि ट्विटरचे नवे मालक इलॉन मस्क यांनी या आठवड्यात नवीन ब्लू टिक व्हेरिफिकेशनसाठी 8 डॉलर देण्याची घोषणा केली. आता ते आयफोनवर सादर करण्यात आलं आहे. आयओएस वापरकर्त्यांसाठी ब्लू टिक व्हेरिफिकेशन सेवा सध्या यूएस, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि यूकेमध्ये सुरू करण्यात आली आहे. iOS वापरकर्त्यांना या सेवेसाठी अ‍ॅपचे लेटेस्ट व्हर्जन अपडेट करावे लागेल. आयफोनच्या ताज्या अपडेटमध्ये, ट्विटरने म्हटले आहे की, “आजपासून आम्ही ट्विटर ब्लूमध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये जोडत आहोत, ज्यामध्ये आणखी अनेक वैशिष्ट्ये लवकरच येत आहेत.” तुम्ही साइन अप केल्यास फक्त 7.99 प्रति डॉलर महिना देऊन Twitter ब्लू मिळवू शकता. ट्विटरने म्हटले आहे की, ‘ब्लू चेकमार्क: लोकांची शक्ती! तुम्ही आधीपासून फॉलो करत असलेल्या सेलिब्रिटी, कंपन्या आणि राजकारण्यांप्रमाणेच तुमच्या खात्यावर ब्लू चेकमार्क मिळेल. फोटो क्रेडिट: Elon Musk/Twitter. ट्विटरवर प्रभू दामोदरन नावाच्या युजरने इलॉन मस्कला टॅग करत विचालंले, ‘ट्विटर ब्लू भारतात कधी सुरू होईल?’ याच्या उत्तरात मस्कने लिहलंय, की ‘एका महिन्यापेक्षा आत सुरू होईल, अशी अपेक्षा आहे’. वाचा - 7 दिवसाच ट्विटरमध्ये हे 7 मोठे बदल; कारभार हाती घेताच एलॉन मस्क यांचा बदलाचा धडाका याशिवाय, मस्क यांनी असेही सांगितले की, ट्विटर लवकरच मोठ्या टेस्क्टची मर्यादा वाढवू शकते, जेणेकरुन ट्विटमध्ये लांब मजकूर लिहण्यास मदत होईल. Twitter ब्लू सबस्क्रिप्शनवर 4 नवीन फीचर मिळणार इलॉन मस्क यांनी सांगितले की, जे यूजर्स ट्विटरवर ब्लू टिकसाठी दरमहा 8 डॉलर देतील त्यांना आणखी 4 सुविधा दिल्या जातील. 1) यामध्ये, ब्लू टिक असलेल्या वापरकर्त्यांना रिप्लाय आणि सर्चमध्ये प्राधान्य देण्याची पहिली सुविधा मिळेल. या फीचरद्वारे, स्पॅम आणि बॉट खाती काढून टाकण्यास मदत होईल. 2) याशिवाय, दरमहा 8 डॉलर भरणाऱ्या वापरकर्त्यांना ट्विटरवर लांब व्हिडिओ आणि ऑडिओ पोस्ट करण्याची सुविधा देखील दिली जाईल.

News18लोकमत
News18लोकमत

3: ब्लू टिक असलेल्या ट्विटर वापरकर्त्यांना या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या सहकार्याने काम करणाऱ्या प्रकाशकांच्या सामग्रीसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत. 4) मस्कने असेही म्हटले आहे की वापरकर्त्यांकडून मिळालेल्या पैशाचा वापर ट्विटरच्या कंटेन्ट निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केला जाईल. पब्लिशर्सने Twitter सोबत करार केल्यास, Twitter Blue पेड आर्टिकल विनामूल्य वाचू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात