मराठी बातम्या /बातम्या /मनी /9 महिन्यात दिला 5000 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न, तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

9 महिन्यात दिला 5000 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न, तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

एखाद्या शेअरने 5000% पेक्षा जास्त (Share Market Return) रिटर्न दिला आहे, ते ही केवळ 9 महिन्यात असे सांगितले तर कुणाचा विश्वास बसणार नाही. एप्रिल 2021 पासून या शेअरमधून इतका रिटर्न मिळाला आहे

एखाद्या शेअरने 5000% पेक्षा जास्त (Share Market Return) रिटर्न दिला आहे, ते ही केवळ 9 महिन्यात असे सांगितले तर कुणाचा विश्वास बसणार नाही. एप्रिल 2021 पासून या शेअरमधून इतका रिटर्न मिळाला आहे

एखाद्या शेअरने 5000% पेक्षा जास्त (Share Market Return) रिटर्न दिला आहे, ते ही केवळ 9 महिन्यात असे सांगितले तर कुणाचा विश्वास बसणार नाही. एप्रिल 2021 पासून या शेअरमधून इतका रिटर्न मिळाला आहे

नवी दिल्ली, 24 डिसेंबर: एखाद्या शेअरने 5000% पेक्षा जास्त (Share Market Return) रिटर्न दिला आहे, ते ही केवळ 9 महिन्यात असे सांगितले तर कुणाचा विश्वास बसणार नाही. एप्रिल 2021 पासून या शेअरमधून इतका रिटर्न मिळाला आहे. हा स्टॉकमध्ये मोठी तेजी आली आहे. EKI एनर्जी असे कंपनीचे नाव असून यावर्षी एप्रिल 2021 मध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत 147 रुपये होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आज (24 डिसेंबर 2021 रोजी) या शेअरची किंमत ₹ 7,779 आहे. जर तुम्ही या दोन आकड्यांमधील टक्केवारीतील फरक मोजला तर लक्षात येईल की या शेअरने 5192 टक्के वाढ नोंदवली आहे.

जाणून घ्या कंपनीविषयी...

EKI एनर्जीची स्थापना 2011 मध्ये झाली. तेव्हापासून ही कंपनी सतत आपल्या क्षेत्रात कार्यरत आहे. या वर्षी एप्रिल 2021 मध्ये, कंपनीला त्यांच्या IPOमधून (Initial Public Offering)  सुमारे 180 मिलियन रुपये उभे करण्याचे लक्ष्य ठेवले होते. कंपनीचा IPO आला आणि पहिल्याच दिवशी कंपनी ₹ 147 ला लिस्ट झाली. तेव्हापासून ही कंपनी सतत वृद्धी होत आहे, अर्थात कंपनीच्या शेअरमध्ये सतत वाढ होत आहे.

हे वाचा-Income Tax च्या कक्षेत येत नसाल तरीही दाखल करा ITR, राहाल फायद्यात

EKI Energy च्या स्टॉकने जवळजवळ दररोज 5% अप्पर सर्किट दिले आहे. मध्ये काही दिवसांच्या घसरणीनंतर स्टॉक पुन्हा अप्पर सर्किट देऊ लागतो. त्यामुळे या कंपनीच्या शेअरसाठी खरेदीदार आहेत, पण कोणीही विकायला तयार नाही आहे.

हे वाचा-कामाची बातमी! गेल्या 3 वर्षांपासून हे 10 शेअर्स देतातेय 50%हून अधिक रिटर्न

EKI एनर्जी काय करते?

2011 मध्ये सुरू झालेली, EKI एनर्जी सर्व्हिसेस (EKI Energy Services) ही भारतातील कार्बन क्रेडिट (Carbon credit) उद्योगातील सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनी हवामान बदल सल्लागार (Climate change advisory), कार्बन क्रेडिट ट्रेडिंग (Carbon credits trading), बिझनेस अॅक्सेलन्स अॅडव्हायजरी (Business excellence advisory) आणि इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिटमध्ये  (Electrical safety audits) सेवा प्रदान करते. पण कार्बन क्रेडिट ट्रेडिंग हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे.

First published:

Tags: Share market