मुंबई, 24 डिसेंबर: तुम्ही इन्कम टॅक्स भरण्याच्या (Income Tax Update) कक्षेत येत नसाल, तरी देखील आयटीआर दाखल (ITR Return Filing) करणे तुमच्या फायद्याचे ठरू शकते. आयकर रिटर्न भरणाऱ्यांपैकी बहुतेक लोकांचा असा समज असतो की ज्यांची कमाई कराच्या कक्षेत येते तेच लोक आयटीआर फाइल करतात. पण ते तसे नाही. तुम्ही कर भरण्याच्या कक्षेत येत नसला तरीही तुम्ही टॅक्स रिटर्न भरला पाहिजे, कारण ITR भरण्याचे अनेक फायदे आहेत.
तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न पात्र नसले तरीही तुम्ही आयटीआर भरावा कारण तुम्हाला त्यातून अनेक फायदे मिळू शकतात. आयटीआर दाखल करणाऱ्यांना कर्ज, कर परतावा सहज मिळू शकतो. उत्पन्नाचा दाखला बनवताना फायदा होतो. अशाप्रकारे, अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांचा फायदा कर रिटर्न भरणाऱ्यांना होतो.
आयटीआरचा वापर तुम्हाला वैध उत्पन्नाचा पुरावा म्हणून देखील करता येईल. शिवाय वैध रहिवासी पुरावा म्हणून देखील आयटीआरचा वापर होतो. व्यवसाय सुरू करण्यासाठीही आयकर रिटर्न भरणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला कोणत्याही विभागाकडून कंत्राट घ्यायचे असेल तर आयटीआर कामी येईल. लक्षात घ्या की, कोणत्याही सरकारी विभागात कंत्राट घेण्यासाठी गेल्या 5 वर्षांचा आयटीआर आवश्यक आहे.
हे वाचा-कामाची बातमी! गेल्या 3 वर्षांपासून हे 10 शेअर्स देतातेय 50%हून अधिक रिटर्न
जाणून घ्या आयटीआर भरण्याचे महत्त्वाचे फायदे
सहज मिळेल कर्ज- जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरला तर तुम्हाला कर्ज सहजपणे मिळू शकते. कारण कोणतेही कर्ज देण्यापूर्वी बँक किंवा फायनान्स कंपनी तुमच्या उत्पन्नाचा तपशील पाहते आणि आयटीआरमध्ये उत्पन्नाचा तपशील असतो. तुमच्या ITR वरूनच तुम्हाला किती कर्ज द्यायचे हे बँक ठरवते. त्यामुळे वेळेवर आयटीआर भरल्यास कर्ज मिळणे सोपे होते. त्यामुळे गृहकर्ज, कार लोन किंवा वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर आयटीआर फाइल करणे आवश्यक आहे.
टॅक्स रिफंड- इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या बचत योजनांमधून मिळणाऱ्या व्याजावर कर सवलत मिळते. तुमचे उत्पन्न एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून असल्यास, हे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही कपात केलेल्या टीडीएसवर पुन्हा दावा करू शकता.
इन्शुरन्ससाठी देखील आवश्यक- विमा कंपन्या अधिक विमा संरक्षण असण्याच्या अटीवर किंवा 1 कोटी रुपयांपर्यंतच्या मुदतीच्या योजनांवर ITR पाहतात. उत्पन्नाचा स्रोत आणि परतफेडीची स्थिती तपासण्यासाठी देखील कंपन्या ITR मागतात.
हे वाचा-टॅक्स वाचवण्यासाठी गृहकर्ज एक चांगला पर्याय! वर्षाला होऊ शकते दीड लाखांची बचत
शेअर्स किंवा म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठीही फायद्याचा- शेअर्स किंवा म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठीही आयटीआर हा एक चांगला स्रोत आहे. नुकसान झाल्यास हा तोटा पुढील वर्षासाठी कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी निश्चित डेडलाइनमध्ये आयकर विवरणपत्र भरणे आवश्यक आहे. पुढील वर्षात भांडवली नफा झाल्यास, तोटा नफ्याच्या तुलनेत अॅडजस्ट केला जाईल आणि तुम्हाला कर सूटमध्ये लाभ मिळेल.
व्हिसा मिळवणे होईल सोपे- आयटीआरच्या आधारे व्हिसा मिळणे सोपे आहे. अनेक देश व्हिसासाठी आयटीआरची मागणी करतात. ज्याद्वारे व्हिसा प्रक्रिया अधिकाऱ्यांना व्यक्तीची सध्याची आर्थिक परिस्थिती आणि उत्पन्नाची माहिती मिळते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Income tax