• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • या गुंतवणुकीत दर वर्षाला मिळतील 36 हजार रुपये, वाचा केंद्र सरकारच्या पेन्शन योजनेबाबत

या गुंतवणुकीत दर वर्षाला मिळतील 36 हजार रुपये, वाचा केंद्र सरकारच्या पेन्शन योजनेबाबत

जर तुम्हीही गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर तुम्ही केंद्र सरकारच्या नव्या योजनेत (Central government scheme) पैसे गुंतवू शकता.

 • Share this:
  नवी दिल्ली, 21 जून : आतापासूनच भविष्यासाठी सेव्ह करणं नेहमीच फायद्याचं ठरतं. गुंतवणुकीसाठी सरकारच्या अनेक अशा स्किम आहेत, ज्याद्वारे फिक्स्ड इन्कम भविष्यासाठी बनवता येतं. जर तुम्हीही गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर तुम्ही केंद्र सरकारच्या नव्या योजनेत (Central government scheme) पैसे गुंतवू शकता. गुंतवणुकीसाठी मोदी सरकारची श्रम योगी जनधन योजना फायदेशीर ठरेल. ही योजना खास अशा लोकांसाठी आहे, जे असंघटित क्षेत्रात काम करतात, त्यांना वार्षिक 36 हजार रुपये पेन्शन दिलं जाईल. या योजनेचा फायदा 18 ते 40 वयोगटातील लोक घेऊ शकतात. या योजनेत प्रीमियमची अमाउंट वयानुसार ठरते. वर्षाला मिळणारी 36000 रुपये रक्कम, दर महिन्याला 3000 रुपये हिशोबाने दिली जाईल. योजनेचा असा घेता येईल फायदा - या योजनेचा फायदा 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात घेता येईल. यासाठी 3.52 लाख कॉमन सर्विस सेंटरही उपलब्ध आहेत. एखाद्या व्यक्तीला भविष्यासाठी या योजनेचा फायदा घ्यायचा असेल, तर जन सेवा केंद्रात जाऊन PM-SYM खातं ओपन करता येईल. यासाठी आधार कार्ड आणि बँक पासबुकसारखी कागदपत्र अत्यावश्यक आहेत. पीएम श्रम योगी मानधन योजनेत (PM Shram Maandhan Yojana) अकाउंट ओपन केल्यानंतर श्रम योगी कार्डही (Shram Yogi Card) दिलं जातं.

  (वाचा - कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर परतफेड कशी करायची?पाहा महत्त्वपूर्ण बाबी)

  काय आहे PM Shram Maandhan Yojana - केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी या पेन्शन योजनेची सुरुवात केली आहे. गुंतवणुकदारांना या योजनेत दर महिन्याला काही पैसे गुंतवावे लागतील. सरकारकडून या योजनेद्वारे गुंतवणुकदाराला 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 3 हजार रुपये प्रति महिना पेन्शनची गॅरेंटी मिळते. या योजनेद्वारे आयुष्यभर पेन्शन मिळतं. या योजनेत जितकं योगदान दिलं जातं, सरकारकडून तुमच्या अकाउंटमध्ये त्याच हिशोबाने योगदान दिलं जातं.
  Published by:Karishma Bhurke
  First published: