मराठी बातम्या /बातम्या /मनी /

कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर परतफेड कशी करायची? जाणून घ्या कर्ज परतफेडीबद्दलच्या महत्त्वपूर्ण बाबी

कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर परतफेड कशी करायची? जाणून घ्या कर्ज परतफेडीबद्दलच्या महत्त्वपूर्ण बाबी

सध्याच्या कोरोनाच्या काळात अनेकांचे अनपेक्षित मृत्यू होत आहेत. त्यामुळे अशी दुर्दैवी वेळ अनेकांवर येत आहे. या पार्श्वभूमीवर, कर्ज परतफेडीबद्दल (Loan Repayment) जाणून घ्या महत्त्वपूर्ण बाबी...

सध्याच्या कोरोनाच्या काळात अनेकांचे अनपेक्षित मृत्यू होत आहेत. त्यामुळे अशी दुर्दैवी वेळ अनेकांवर येत आहे. या पार्श्वभूमीवर, कर्ज परतफेडीबद्दल (Loan Repayment) जाणून घ्या महत्त्वपूर्ण बाबी...

सध्याच्या कोरोनाच्या काळात अनेकांचे अनपेक्षित मृत्यू होत आहेत. त्यामुळे अशी दुर्दैवी वेळ अनेकांवर येत आहे. या पार्श्वभूमीवर, कर्ज परतफेडीबद्दल (Loan Repayment) जाणून घ्या महत्त्वपूर्ण बाबी...

नवी दिल्ली, 21 जून: कर्ज हा सध्याच्या काळात जवळपास प्रत्येकाच्या रोजच्या जीवनाचा भाग झालाय असं म्हटलं तरी अतिशयोक्तीचं ठरणार नाही. कारण विविध बँका (Banks), पतसंस्थांनी (Financial Institutes) सुलभ कर्जाच्या योजना आखून अधिकाधिक जणांना त्याचा लाभ देण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्याशिवाय क्रेडिट कार्ड माध्यमातून दिल्या जाणाऱ्या कर्जांचं प्रमाणही वाढलं आहे. एखादी गोष्ट आपल्याला विकत घेणं शक्य नसेल आणि बचत करून पैसे साठवून घेण्याएवढा वेळ, थांबण्याची तयारी नसेल, तर कर्ज हा इच्छापूर्तीचा उत्तम मार्ग ठरतो. दर महिन्याला ठरलेला हप्ता (EMI) भरण्याची तयारी असेल, तर कोणाकडून पैसे घेण्यापेक्षा कर्ज (Loan) हा उत्तम मार्ग आहे.

पण दुर्दैवाने, कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर? संबंधित व्यक्ती जिवंत असेपर्यंत नियमितपणे कर्जाचे हप्ते भरत होती, पण त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर काय? त्याचं राहिलेलं कर्ज कोण फेडणार? ती त्याच्या कुटुंबियांची जबाबदारी असते का? असे अनेक प्रश्न पडतात. सध्याच्या कोरोनाच्या काळात तर अनेकांचे अनपेक्षित मृत्यू होत आहेत. त्यामुळे अशी दुर्दैवी वेळ अनेकांवर येत आहे. या पार्श्वभूमीवर, कर्ज परतफेडीबद्दल (Loan Repayment) जाणून घ्या महत्त्वपूर्ण बाबी...

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, कर्जाचे वेगवेगळे प्रकार असतात. घरासाठी घेतलेलं कर्ज (Home Loan), वाहनासाठी घेतलेलं कर्ज (Vehicle Loan), वैयक्तिक कर्ज (Personal Loan), शैक्षणिक कर्ज (Education Loan), क्रेडिट कार्डवर घेतलेलं कर्ज, इत्यादी. यापैकी गृह कर्ज किंवा वाहन कर्ज आदी प्रकारचं कर्ज वसूल करणं बँकेसाठी सोपं असतं. कारण ते कर्ज देताना संबंधित मालमत्ता बँकेच्या नावावर असते. गृह कर्ज दीर्घ काळाच्या मुदतीचं असतं. त्यामुळे बँकेने सर्व शक्यतांचा विचार करूनच कर्जाची व्यवस्था केलेली असते. कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तरी कर्जाच्या वसुलीवर परिणाम होऊ नये, याचा विचार केलेला असतो. या कर्जात कर्ज घेणाऱ्या व्यक्तीची पत्नी किंवा पती यांना सह-अर्जदार केलेलं असतं. त्यामुळे एका अर्जदाराचा मृत्यू झाला, तरी दुसऱ्या अर्जदाराकडून कर्जवसुली करता येते. तसंच, कर्ज घेणाऱ्या व्यक्तीकडे पुरेशा रकमेची विमा पॉलिसी आहे की नाही, हेदेखील तपासलं जातं.

(वाचा - Online Financial Fraud झालाय? घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल)

दोन अर्जदारांपैकी (Co-Borrower) एकाचा मृत्यू झाल्यास तशी माहिती बँकेला देणं गरजेचं आहे. तसंच, मृत झालेल्या व्यक्तीच्या खात्यातून हप्त्याचे पैसे जमा होत असतील, तर त्यात बदलही करून घेणं गरजेचं आहे.

कर्ज घेतलेल्या व्यक्तीच्या अचानक मृत्यूनंतर कर्जाचा बोजा (Loan) त्याच्या कुटुंबियांवर पडू नये, यासाठी कर्ज घेताना टर्म पॉलिसी घेणं किंवा कर्जाचा विमा उतरवणं फायद्याचं ठरतं. त्यामुळे संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला, तरी विम्याच्या रकमेतून कर्जफेड करणं त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना शक्य होतं.

कर्जदाराचा मृत्यू झाल्यास बँकेकडून सह-कर्जदाराला कर्जफेडीची सिस्टम बसवण्यासाठी वेळ दिला जातो, असं सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर पंकज मठपाल सांगतात. संबंधित व्यक्तीचा पती/पत्नी कर्जफेडीच्या स्थितीत नसतील, तर त्यांच्या मुला-मुलींनाही ते फेडणं शक्य असतं. त्यांचं क्रेडिट रेटिंग पाहून त्यांना ईएमआय निश्चित करून दिला जातो. कोणीच कर्जफेड करणार नसेल, तर संबंधित घर किंवा मालमत्ता ताब्यात घेण्याचा अधिकार बँकेला Sarfaesi कायद्यानुसार आहे. संबंधित घराचा लिलाव करून बँक आपली कर्जाची रक्कम वसूल करू शकते.

(वाचा - कर्ज घेतलंय? 'या' चुका अजिबात करू नका, बसू शकतो मोठा फटका)

शिक्षणासाठीचं कर्जही जामीन घेतल्याशिवाय दिलं जात नाही. कर्ज मोठ्या रकमेचं असेल, तर पालकांना त्यांची मालमत्ता गहाण ठेवावी लागते. विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर जामीन राहिलेल्या व्यक्तींकडून कर्ज वसूल केलं जातं. गरज पडल्यास संबंधितांची मालमत्ताही जप्त केली जाऊ शकते.

वाहनासाठी कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर बँकेकडून कुटुंबियांना कर्जफेडीस सांगितलं जातं. त्यांना शक्य नसेल, तर संबंधित वाहनाचा लिलाव करून बँक आपली रक्कम वसूल करते.

पर्सनल लोन (Personal Loan) किंवा क्रेडिट कार्ड लोन (Credit Card Loan) यांना अनसिक्युअर्ड लोन (Unsecured Loan) असं म्हटलं जातं. कारण त्यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा नसते. अशा प्रकारचं कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास बँक कर्ज राइट-ऑफ करते अर्थात बुडीत खात्यात टाकते. कायदेशीर वारसाला हे कर्ज फेडण्यासाठी बँकेकडून भाग पाडलं जाऊ शकत नाही. असं कर्ज देताना संबंधित व्यक्तीचा विमा आहे का, ते बँका पाहतात. त्यामुळे व्यक्तीच्या मृत्यूनंतर विमा कंपनीकडून आपली रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न बँका करू शकतात. संबंधित व्यक्तीचे नातेवाईक स्वेच्छेने कर्जफेड करणार असतील तर प्रश्नच मिटतो. पण तसं नसेल, तर बँक या प्रकारच्या कर्जांच्या बाबतीत नातेवाईकांना कर्जफेडीला भाग पाडू शकत नाही.

First published:

Tags: Home Loan, Instant loans, Loan, Pay the loan