मराठी बातम्या /बातम्या /मनी /

EPFO Updates: कुटुंबासाठी पूर्ण करा हे काम, वाचा EPFO मध्ये नॉमिनीचे काय आहेत फायदे

EPFO Updates: कुटुंबासाठी पूर्ण करा हे काम, वाचा EPFO मध्ये नॉमिनीचे काय आहेत फायदे

तुम्ही जर नोकरदार वर्गापैकी असाल आणि पीएफ खातेधारक (EPFO Alert) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्ही पीएफ खात्यात नॉमिनीचे नाव जोडण्याचे काम पूर्ण केले नसेल तर लवकरात लवकर हे काम पूर्ण करा

तुम्ही जर नोकरदार वर्गापैकी असाल आणि पीएफ खातेधारक (EPFO Alert) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्ही पीएफ खात्यात नॉमिनीचे नाव जोडण्याचे काम पूर्ण केले नसेल तर लवकरात लवकर हे काम पूर्ण करा

तुम्ही जर नोकरदार वर्गापैकी असाल आणि पीएफ खातेधारक (EPFO Alert) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्ही पीएफ खात्यात नॉमिनीचे नाव जोडण्याचे काम पूर्ण केले नसेल तर लवकरात लवकर हे काम पूर्ण करा

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 29 डिसेंबर: तुम्ही जर नोकरदार वर्गापैकी असाल आणि पीएफ खातेधारक (EPFO Alert) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्ही पीएफ खात्यात नॉमिनीचे (EPFO E-nomination Process) नाव जोडण्याचे काम पूर्ण केले नसेल तर लवकरात लवकर हे काम पूर्ण करा. शिवाय नॉमिनीच्या नावात किंवा तपशीलात काही बदल असेल तर ती देखील प्रक्रिया पूर्ण करा. हे काम तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. तुम्ही घरबसल्या डिजिटल माध्यमातून नॉमिनी जोडण्याचे काम पूर्ण करू शकता.

पीएफ अकाउंट होल्डर्स नॉमिनीनेशनची प्रक्रिया ऑनलाइन देखील पूर्ण करू शकता. ईपीएफओ एकापेक्षा जास्त नॉमिनी (EPFO E-nomination deadline) जोडण्याची सुविधा अकाउंट होल्डर्सना देत आहे. याशिवाय पीएफ अकाउंट होल्डर्स नॉमिनीला मिळणारी भागीदारी देखील निश्चित करू शकता

नॉमिनी जोडण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

>> सर्वप्रथम ईपीएफओची अधिकृत वेबसाइट www.epfindia.gov.in ओपन करा. याठिकाणी सर्व्हिस टॅबवर क्लिक करुन,  For Employees चा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर Member UAN / Online Service वर क्लिक करा.

>> आता तुम्हाला UAN आणि पासवर्डद्वारे लॉग इन करावे लागेल.

>> मॅनेज सेक्शनमध्ये जाऊन ई-नामांकन (e-Nomination) लिंकवर क्लिक करा.

हे वाचा-Income Tax विभागाचा करदात्यांना दिलासा, फेब्रुवारी 2022 पर्यंत करता येईल हे काम

>> आता नॉमिनीचे नाव आणि इतर तपशील भरा. यानंतर तुम्हाला Provide Details दिसेल, यामध्ये तुम्हाला काही अपडेट करायचे असेल तर Yes वर क्लिक करुन नवीन माहिती भरुन सेव्ह करा, अन्यथा सेव्ह वर क्लिक करा.

>> जर तुम्ही Yes वर क्लिक केले तर तुम्हाल कुटुंबाची माहिती विचारली जाते. यात Add Family Details वर क्लिक करा. तुम्हाला एकापेक्षा जास्त नॉमिनी जोडता येतील. याठिकाणी त्यांची भागीदारी देखील तुम्हाला निश्चित करता येईल. ही माहिती भरल्यानंतर  Save EPF Nomination वर क्लिक करा.

>> यानंतर आधारशी लिंक मोबाइल क्रमांकावर तुम्हाला ओटीपी येईल, तो प्रविष्ट केल्यानंतर तुमची ई-नॉमिनेशनची प्रक्रिया पूर्ण होईल.

का महत्त्वाचे आहे ई-नॉमिनेशन?

तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी EPF/EPS खात्यात ई-नामांकन प्रक्रिया पूर्ण असणे खूप महत्त्वाचे आहे. EPFO सदस्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला PF, निवृत्तीवेतन आणि विमा (EDLI) हे लाभ सहजपणे मिळण्यास यामुळे मदत होते. नॉमिनी असणाऱ्या व्यक्तीला ऑनलाइन क्लेम करण्याची सुविधा देखील मिळते.

हे वाचा-स्वस्त सोनेखरेदीची संधी, 22-24 कॅरेट सोन्याचे दर उतरले; तपासा लेटेस्ट भाव

EPFO ची ही प्रक्रिया पीएफ खातेधारकांवर अवलंबून असणाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी आहे. पीएफ खातेधारकांसह काही अनुचित प्रकार घडल्यास, नामांकित व्यक्तीला विमा आणि पेन्शन यासारखे फायदे मिळतात. अलीकडेच EPFO ​​ने म्हटले होते की, 'EPFO सदस्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी ई-नॉमिनेशनच्या सुविधेचा लाभ घ्यावा. भविष्य निर्वाह निधी, पेन्शन आणि विमा सेवांचा ऑनलाइन लाभ घेण्यासाठी तुमचे ई-नामांकन दाखल करा. तुमची पत्नी, मुले आणि पालकांची काळजी घेण्यासाठी आणि ऑनलाइन पीएफ, पेन्शन आणि विम्याद्वारे त्यांचे संरक्षण करण्यासाठी ग्राहकाने नॉमिनेशन दाखल करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.'

हे वाचा-नवीन वर्ष महागाईचे! वाढणार LPG सिलेंडरचे दर, डिजिटल पेमेंटमध्येही होणार बदल

EPFO ने नॉमिनी जोडण्याचं काम पूर्ण करण्यासाठी 31 डिसेंबर 2021 ही डेडलाइन निश्चित करण्यात आली आहे. जर तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत तुमच्या पीएफ खात्यात नॉमिनी जोडला नाही तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

First published:

Tags: Epfo news, Pf