जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Good News! स्वस्त सोनेखरेदीची संधी, 22-24 कॅरेट सोन्याचे दर उतरले; तपासा लेटेस्ट भाव

Good News! स्वस्त सोनेखरेदीची संधी, 22-24 कॅरेट सोन्याचे दर उतरले; तपासा लेटेस्ट भाव

  राज्यस्थान येथील तिन्ही युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

राज्यस्थान येथील तिन्ही युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

सोन्याच्या किमतीत आज घसरण पाहायला (Gold Rates down today) मिळाली आहे. त्यामुळे तुमच्याकडे सोनेखरेदीची संधी आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 29 डिसेंबर: सोन्याच्या किमतीत आज घसरण पाहायला (Gold Rates down today) मिळाली आहे. त्यामुळे तुमच्याकडे सोनेखरेदीची संधी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Gold Rate on MCX) आज सोन्याचे दर 0.08 टक्क्यांच्या घसरणीने व्यवहार करत आहेत. तर चांदीच्या किंमतीतही आज घसरण (Silver Price Today) दिसून आली. आज चांदीचे दर 0.20 टक्क्यांनी उतरले आहेत. 8,195 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोन्याचे दर 8195 रुपयांनी स्वस्त आहेत. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर एमसीएक्सवर 56,200 रुपये प्रति तोळाच्या सर्वोच्च स्तरावर (Gold Rate on Record High) पोहोचले होते. आज सोन्याचे दर 48,005 रुपये प्रति तोळावर आहेत. त्यामुळे सोनं जवळपास 8000 रुपयांनी स्वस्त मिळतं आहे. सोन्याचांदीचा आजचा भाव आज सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर एमसीएक्सवर भाव 48,005 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. तर चांदी उतरल्यानंतर 62,460 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत आहे. हे वाचा- नवीन वर्ष महागाईचे! वाढणार LPG सिलेंडरचे दर, डिजिटल पेमेंटमध्येही होणार बदल महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 24 कॅरेट सोन्याचा दर

शहरआजचा दर (प्रति तोळा)कालचा दर (प्रति तोळा)
मुंबई48190 रुपये48220 रुपये
पुणे48,880 रुपये48,890 रुपये
नाशिक48,880 रुपये48,890 रुपये
नागपूर48190 रुपये48220 रुपये

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 22 कॅरेट सोन्याचा दर

शहरआजचा दर (प्रति तोळा)कालचा दर (प्रति तोळा)
मुंबई47190 रुपये47220 रुपये
पुणे46,360 रुपये46,370 रुपये
नाशिक46,360 रुपये46,370 रुपये
नागपूर47190 रुपये47220 रुपये

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये चांदीचा दर

शहरआजचा दर (प्रति किलो)कालचा दर (प्रति किलो)
मुंबई62500 रुपये62500 रुपये
पुणे62500 रुपये62500 रुपये
नाशिक62500 रुपये62500 रुपये
नागपूर62500 रुपये62500 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तपासायची? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘BIS Care App’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा भाव सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात