मराठी बातम्या /बातम्या /मनी /Income Tax विभागाचा करदात्यांना दिलासा, फेब्रुवारी 2022 पर्यंत पूर्ण करता येईल हे काम

Income Tax विभागाचा करदात्यांना दिलासा, फेब्रुवारी 2022 पर्यंत पूर्ण करता येईल हे काम

ज्या करदात्यांनी आर्थिक वर्ष 2019-20 साठी त्यांच्या आयकर रिटर्नचे (Income Tax Return Update) अद्याप ई-सत्यापन (e-verification of ITR) केले नाही आहे, त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.

मुंबई, 29 डिसेंबर: ज्या करदात्यांनी आर्थिक वर्ष 2019-20 साठी त्यांच्या आयकर रिटर्नचे (Income Tax Return Update) अद्याप ई-सत्यापन (e-verification of ITR) केले नाही आहे, त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला ही व्हेरिफिकेशनची प्रक्रिया 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत पूर्ण करता येईल. आयकर विभागाने करदात्यांना दिलासा देत हा निर्णय घेतला आहे.

कायद्यानुसार, डिजिटल स्वाक्षरीशिवाय इलेक्ट्रॉनिक पद्धतीने इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) दाखल केल्यानंतर त्याचे आधार OTP (Aadhaar OTP), नेट-बँकिंग (Net-banking), डिमॅट खात्याद्वारे (Demat account) पाठवलेला कोड, आधीच व्हॅलिडेट केलेले  बँक खाते किंवा ATM च्या माध्यमापून सत्यापन करावे लागते. ही पडताळणी आयकर रिटर्न भरल्यानंतर 120 दिवसांच्या आत करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आर्थिक वर्ष 2020-21 साठी ITR भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. यानंतर आयटीआर दाखल केल्यास दंड आकारला जाईल.

हे वाचा-Penny Stock मध्ये गुंतवणूक करताना खबरदारी घ्या; पैसे बुडण्याची शक्यताही जास्त

फिजिकली देखील कॉपी पाठवता येईल

याशिवाय, करदाता ITR ची भौतिक प्रत बेंगळुरू येथील सेंट्रलाइज्ड प्रोसेसेस सेंटर (CPC) कार्यालयात पाठवून त्याची सत्यापन प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतात. जर ही व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर रिटर्न भरला गेला नाही, असे मानले जाते.

हे वाचा-ZebPay सह तुम्ही तुमचा क्रिप्टोकरन्सी प्रवास का सुरू करावा याची 5 ठोस कारणे

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने 28 डिसेंबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की 2020-21 अॅसेसमेंट इयरसाठी मोठ्या संख्येने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दाखल केलेले ITR अजूनही प्राप्तिकर विभागाकडे प्रलंबित आहेत. कारण याकरता वैध ITR-V पावती प्राप्त झालेली नाही किंवा करदात्यांनी याबाबत ई-व्हेरिफिकेशन केलेले नाही.

First published:
top videos

    Tags: Income tax