Home /News /money /

नवीन वर्ष महागाईचे! वाढणार LPG Cylinder Price, डिजिटल पेमेंटमध्येही होणार बदल

नवीन वर्ष महागाईचे! वाढणार LPG Cylinder Price, डिजिटल पेमेंटमध्येही होणार बदल

1 जानेवारी 2022 पासून काही महत्त्वाच्या नियमात बदल होणार (Big Changes From 1st January 2022) आहेत. खासकरून ग्राहकांच्या हितासंदर्भातील नियमात हे बदल होत आहेत.

    नवी दिल्ली, 29 डिसेंबर: नवीन वर्षाची सर्वांनाच (New Year 2022) प्रतीक्षा आहे. हे नवीन वर्ष सामान्यांसाठी, मध्यमवर्गीयांसाठी काहीसे महागाईचे ठरण्याची शक्यता आहे. 1 जानेवारी 2022 पासून काही महत्त्वाच्या नियमात बदल होणार (Big Changes From 1st January 2022) आहेत. खासकरून ग्राहकांच्या हितासंदर्भातील नियमात हे बदल होत आहेत. नवीन वर्षापासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीबाबत (LPG Cylinder Price) महत्त्वाचा निर्णय होईल. महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीबाबत समीक्षा बैठक घेतली जाते. यावेळी होणाऱ्या बैठकीत एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरवाढीची शक्यता आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती काहीशा वाढल्या आहेत. मात्र असा देखील अंदाज बांधला जात आहे की पुढील वर्षी पाच राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमुळे मोदी सरकार पेट्रोल-डिझेल प्रमाणेच एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती देखील कमी करू शकतं. हे वाचा-मुंबईकरांना आजही पेट्रोलसाठी मोजावी लागणार मोठी किंमत, वाचा आजचा भाव 1 जानेवारी 2022 पासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती वाढणार? दिवाळीपूर्वीच एलपीजी गॅसच्या दरात वाढ करण्यात आली होती. एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 266 रुपयांनी मोठी वाढ झाली होती, ही वाढ केवळ व्यावसायिक सिलेंडरमध्ये करण्यात आली होती. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता. मुंबईत 1683 रुपयांना मिळणारा 19 किलोचा सिलेंडर सध्या 1950 रुपयांना मिळत आहे. हे वाचा-'या' सरकारी कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल 117 टक्क्यांची वाढ; गुंतवणूकदार मालामाल यासोबतच नव्या वर्षात डिजिटल पेमेंटबाबतही मोठा बदल होणार आहे. आतापासून सर्व बँका त्यांच्या ग्राहकांना याबाबत माहिती देत ​​आहेत. मोफत मासिक मर्यादा संपल्यानंतर डिजिटल पेमेंटसाठी वाढलेले शुल्क लागू होईल. मोफत मर्यादेपेक्षा अधिकच्या एटीएम व्यवहारावर 20 रुपये शुल्कासह GST शुल्क आकारले जाते,  बर्‍याच बँका 1 जानेवारी 2022 पासून ते शुल्क आता 21 रुपये प्लस GST करतील.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: LPG Price

    पुढील बातम्या