जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Pune : चक्क रांगा लावून केली सोन्याची खरेदी, दिवाळीत 100 कोटींची उलाढाल, VIDEO

Pune : चक्क रांगा लावून केली सोन्याची खरेदी, दिवाळीत 100 कोटींची उलाढाल, VIDEO

Pune : चक्क रांगा लावून केली सोन्याची खरेदी, दिवाळीत 100 कोटींची उलाढाल, VIDEO

यावर्षी पुण्यामध्ये दिवाळीनिमित्त चक्क 100 कोटी रुपयांची सोन्याची खरेदी झाली आहे.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

    पुणे, 26 ऑक्टोबर : प्रकाश आणि मांगल्याचा सण म्हणजे  दिवाळी  . दिवाळी या सणामुळे वर्षभरातली सर्व मळभ साफ होते. तसेच सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते. याच दिवाळी सणामध्ये मोठ्या प्रमाणावर सर्व शहरांमध्ये मोठी खरेदी विक्री होते. दिवाळीत सगळ्या चांगल्या मुहूर्तांची मांदियाळी असते. यामुळे या काळामध्ये वाहने आणि सोने खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते. यावर्षी पुण्यामध्ये दिवाळीनिमित्त चक्क 100 कोटी रुपयांची सोन्याची खरेदी झाल्याची माहिती गोल्ड असोसिएशनचे फतेचंद रांका यांनी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधीने दुकानदार आणि ग्राहकाशी संवाद साधला आहे.

    <span style=“font-family: ‘” sans-serif"’;"="">सोन्याची खरेदी बाबत अष्टेकर ज्वेलर्सचे योगेंद्र अष्टेकर यांनी सांगितले की, कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणावर सोन्याला फटका बसला होता. तसेच सोन्याचे दर देखील जास्त होते. मात्र, यावर्षी दिवाळीला सोन्याचे दर कमी झाले आहेत. 53 हजारावरचे सोने 49 हजारापर्यंत आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांनी रांगा लावून यावेळेस सोने खरेदी केले.  

    हेही वाचा : Pune : झणझणीत मिसळीचा रंग तांबडा नाही तर हिरवा, पाहा VIDEO

    <span style=“font-family: ‘” sans-serif"’;"="">तसेच कोरोनाच्या दोन वर्षानंतर लोकांना आता आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे. यामुळे देखील लोकांचा कल सोने खरेदीकडे वाढलेला दिसून आला. येणाऱ्या लग्नसराईच्या मुहूर्ता मुळे देखील आत्ता मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जात आहे, असं देखील अष्टेकर यांनी सांगितले.

     <span style=“font-family: ‘” sans-serif"’;"=""> सध्या सोन्याचे दर कमी झालेले आहेत. तसेच दिवाळीमध्ये धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन आणि पाडवा या तीन दिवशी सोने खरेदी करणे शुभ असते आणि आपल्या प्रियजनांना या कालावधीमध्ये सोने गिफ्ट म्हणून देऊ शकतो. यामुळे देखील आम्ही सोने खरेदी करण्यासाठी दिवाळीची वाट बघत असतो, असं सोने खरेदी करायला आलेल्या ग्राहकांनी सांगितले.    

    हेही वाचा :  हातगाड्यावर सुरूवात झालेला ‘लक्ष्मीनारायण चिवडा’ कसा बनला जागतिक ब्रँड? पाहा Video

     <span style=“font-family: ‘” sans-serif"’;"="">दरम्यान, सध्या सोन्याच्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती खरेदी विक्री होत आहे. तसेच नवनवीन डिझाईन देखील बाजारत उपलब्ध आहेत. यामुळे देखील लोक सोने खरेदीकडे वळले आहेत. सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट देखील लोकांचा मुख्य उद्देश असतो आणि त्यासाठी देखील लोक शुभमुहूर्ताची वाट बघत असतात. दिवाळी सारखा शुभ मुहूर्त दुसरा कोणताही नसल्यामुळे या कालावधीमध्ये सोने खरेदी मोठ्या प्रमाणावर होते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: business , pune
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात