पुणे, 26 ऑक्टोबर : पुण्यात आल्यानंतर मिसळ खाल्ली नाही असं कोणी केलं असेल तर त्या व्यक्तीने फार मोठी गोष्ट मिस केली आहे. कारण पुण्यात प्रत्येक कोपऱ्यावर मिसळ मिळते आणि तीही वेगवेगळ्या चवीची. पण तरीही चवीने खाणाऱ्या खवय्यांसाठी काही ठिकाणं मात्र अधिक जवळची आहेत. त्यापैकीच एक गेले 110 वर्षांपासून पुण्यातील फडके हौद येथील वैद्य उपहारगृहाची झणझणीत मिसळ आजपर्यंत उत्कृष्ट मिसळचा मान पटकावून आहे. 110 वर्षांपूर्वी रघुनाथ वैद्य यांनी वैद्य उपहारगृहाची सुरुवात केली हाेती. तेव्हापासून आजपर्यंत वैद्य उपहारगृहाने मिसळची चव राखून ठेवली आहे. पूर्वीच्या काळी पुण्यामध्ये फार कमी ठिकाणी मिसळ मिळत असे. सुरुवातीच्या काळातील मिसळ पैकी वैद्य उपहारगृह एक आहे. इतर ठिकणी मिळणाऱ्या मिसळपेक्षा या ठिकाणची मिसळ वेगळी असल्याने इथे माेठी गर्दी असते. हेही वाचा :
हातगाड्यावर सुरूवात झालेला ‘लक्ष्मीनारायण चिवडा’ कसा बनला जागतिक ब्रँड? पाहा Video मिसळची खास वैशिष्टय पूर्वी मिसळ म्हणजे मटकीची भाजी, पोहे, वड्याच्या भाजीचा बटाटा आणि त्यामध्ये वडे तळल्यावरती राहिलेल्या चुरा टाकून पुरी सोबत अशी मिसळ दिली जायची. मात्र आम्ही त्याच्यामध्ये काही बदल करत गेलो आणि आम्ही वेगळ्या पद्धतीची मिसळ तयार केली. यामध्ये पहिल्यांदा कांदेपोहे, बटाटे, मटकीची उसळ आणि शेव आणि पातळ पोह्याचा चिवडा हे आम्ही मिसळमध्ये घालण्यास सुरुवात केली. त्यासोबतच आम्ही आमच्या मिसळमध्ये चिंच वापरतो तसेच ही मिसळ आलं, मिरची, लसूण या पेस्ट पासून बनते. यामुळे या मिसळला लाल तिखट टाकायची गरज लागत नाही. यामुळे मिसळचा रंग आपल्याला हिरवा असा दिसतो. तसेच ही मिसळ सुरू झाल्यानंतर वीस पंचवीस वर्षानंतर आम्ही मिसळमध्ये हिरवे कच्चे टोमॅटो वापरायला सुरुवात केली. त्यापूर्वी पुण्यामध्ये टोमॅटो खाद्यपदार्थांमध्ये वापरले जात नव्हते. यामुळे आमच्या मिसळला एक वेगळा आंबटपणा आणि मिरचीचा तिखटपणा जाणवतो, असं वैद्य उपहारगृहाचे मालक दीपक जोशी सांगतात. हेही वाचा :
Time Cafe : पुण्यातील कॅफेमध्ये पदार्थांची नाही तर वेळेची मोजावी लागते किंमत! पाहा Video मी 40 वर्षांपासून इथे मिसळ खातोय. या ठिकाणची मिसळ इतर मिसळ पेक्षा एक वेगळी मिसळ आहे. या ठिकाणच्या मिसळची चव चांगली असते, असं खवय्ये सुरेश राव यांनी सांगितले. काय आहे मिसळची किंमत सकाळी सात ते सकाळी साडेअकरा तसेच दुपारी तीन ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत वैद्य उपाहारगृह चालू असते. इथली मिसळ 80 रुपयाला एक प्लेट मिळते आणि इतरही पदार्थ यासोबत मिळतात.
वैद्य उपाहारगृहचा पत्ता वैद्य उपाहारगृह बागडे रोड, बुधवार पेठ, पुणे,महाराष्ट्र
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.