मराठी बातम्या /बातम्या /मनी /मोबाईलमध्ये 'हे' 12 अ‍ॅप असतील तर सावधान! कोणतरी ठेवतंय तुमच्यावर नजर

मोबाईलमध्ये 'हे' 12 अ‍ॅप असतील तर सावधान! कोणतरी ठेवतंय तुमच्यावर नजर

धोकादायक अ‍ॅप

धोकादायक अ‍ॅप

हे अ‍ॅप यूझर्सला अनलिमिटेड जाहिराती पाहण्यास भाग पाडायचे आणि या बहाण्याने त्यांच्याशी संबंधित माहिती चोरत होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • New Delhi, India

नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी: अँड्रॉइड स्मार्टफोन यूझर्सला काही अ‍ॅप्स फोनमध्ये न ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय. हे अ‍ॅप्स तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात. डॉ. वेबच्या सायबर सिक्युरिटी टीमच्या रिपोर्टनुसार, गुगलने प्ले स्टोअरवरून 12 अ‍ॅप काढून टाकलेय. हे अ‍ॅप यूझर्सला अनलिमिटेड जाहिराती पाहण्यास भाग पाडायचे. तसेच या बहाण्याने यूझर्सची माहिती चोरत होते. सायबर सुरक्षेनुसार, यापैकी काही अ‍ॅप्स असे देखील होते की ते खूप लोकप्रिय देखील होते. त्याला 5 मिलियनहून अधिक यूझर्सने डाउनलोड केले होते.

व्हिक्टिम बनवून पेड सर्व्हिस घेण्यासाठी भाग पाडले जात होते

Dr.Web ने मिळवलेल्या माहितीनुसार, डिसेंबरमध्ये अँड्रॉइडवर अ‍ॅडवेअर ट्रोजन आणि स्पायवेअर अ‍ॅक्टिव्हिटी झपाट्याने वाढत होती. याशिवाय गुगल प्लेवर आणखी काही धमक्याही दिसत होत्या. काही बनावट अ‍ॅप्स आणि ट्रोजन देखील होते जे यूझर्सला व्हिक्टिम बनवून पेड सर्व्हिस घेण्यास भाग पाडत होते.

कमी खर्चात Flipkart वर खरेदी करायचीये? मग 'या' कार्डविषयी माहिती असायलाच हवी

रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली फसवणूक

तीनपैकी दोन अ‍ॅप्स असे होते की, ते यूझर्सला दररोज वॉक आणि एक्सरसाइज रिवॉर्ड पॉइंट द्यायचे. यानंतर, यूझर्सने  त्यांचे पॉइंट्स रिडीम करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते त्यांना खूप जाहिराती पाहण्यास भाग पाडले जात होते. गुगलने असे दोन अ‍ॅप प्ले स्टोअरवरून काढून टाकले आहेत. एक अजुनही Google Play Store वर आहे.

जर तुम्ही असे अ‍ॅप डाउनलोड केले असेल, तर गुगल अ‍ॅपवरून काढून टाकल्यानंतरही ते तुमच्या स्मार्ट फोनमध्येच दिसेल. तसे असल्यास, तत्काळ ते अ‍ॅप्स हटवा. गुगलने सध्या हे अ‍ॅप्स प्ले स्टोअरवरून काढून टाकले आहेत.

काय सांगता? फक्त 24 हजारात मिळतोय आयफोन, Amazon वर खास ऑफर

ही आहे अ‍ॅप्सची यादी

-Golden Hunt

-Reflector

-Fitstar

-Seven Golden Wolf BlackJack

-Unlimited Score

-Big Decisions

-Jewel Sea

-Lux Fruits Game

-Lucky Clover

-King Blitz

अ‍ॅप डाउनलोड करताना लक्षात ठेवा या गोष्टी

-कोणतेही अ‍ॅप कधीही डाउनलोड करण्यापूर्वी काही खबरदारी घेणे आवश्यक आहे.

-सर्व प्रथम त्या अ‍ॅपचे रेटिंग आणि रिव्ह्यूज चेक करा.

-नेहमी केवळ ट्रस्टेड डेव्हलपरचेच अ‍ॅप्स डाउनलोड करा.

-अज्ञात अ‍ॅप्स डाउनलोड करणे टाळा.

-तुमचे डिव्हाइस अँटीव्हायरसने संरक्षित करा.

-स्मार्टफोनला वेळोवेळी अपडेट करत राहा जेणेकरून बग फिक्स होत राहतील.

First published: