फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड हे को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड आहे. यामध्ये फ्लिपकार्ट शॉपिंगवर एक्स्ट्रा फायदा मिळतो. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कॅशबॅकवर कोणतीही मर्यादा नसते. म्हणजेच तुम्ही एका बिलिंग सायकलमध्ये अनलिमिटेड कॅशबॅक मिळवू शकता. कमावलेला कॅशबॅक तुमच्या क्रेडिट कार्ड अकाउंटमध्ये जमा होतो.
या कार्डद्वारे पेट्रोल पंपांवर 400 ते 4 हजार रुपयांच्या फ्यूल खरेदीवर 1 टक्के फ्यूल सरचार्ज भरावा लागणार नाही. बिलिंग सायकलमध्ये कमाल 500 रुपयांचा फ्यूल सरचार्ज माफ केला जाऊ शकतो. हे कार्ड कॉन्टॅक्टलेस तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. जे ग्राहकांना 'टॅप आणि पे' ची सुविधा देखील देते. म्हणजेच कार्ड स्वाइप न करता फक्त POS मशीनवर टॅप करून पेमेंट करता येते.