UIDAI ची खास भेट, 'इथे' तयार करून मिळेल आधार कार्ड

UIDAI ची खास भेट, 'इथे' तयार करून मिळेल आधार कार्ड

UIDAI नं सर्वसाधारण जनतेसाठी जास्त सेवा देण्याचा निर्णय घेतलाय

  • Share this:

मुंबई, 15 जून : UIDAI नं सर्वसाधारण जनतेसाठी जास्त सेवा देण्याचा निर्णय घेतलाय. UIDAI ही संस्था आधार कार्ड देण्याचं काम करते. या आठवड्यापासून 3.9 लाख CSC काॅमन सर्विस सेंटरमध्ये आधारसंबंधी सर्व सेवा पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. UIDAI नं या केंद्रांना तशी परवानगी दिलीय. याचा सर्वात जास्त फायदा ग्रामीण क्षेत्रातल्या लोकांना मिळेल. त्यांना आधार कार्ड तयार करणं सोपं होईल.

काय आहे काॅमन सर्विस सेंटर?

3.9 लाख व्हिलेज लेव्हल एन्टरप्रेन्योर्स (VLE ) देशभरात काॅमन सर्विस सेंटर चालवतात. ते लोकांना ट्रेन तिकीट बुक करणं, पासपोर्टसाठी अर्ज देणं, बर्थ सर्टिफिकेट बनवून देणं, आयुष्मान भारत योजनेत रजिस्टर्ड करणं या सुविधा देतात.

नव्या अर्थमंत्र्यांकडून देशाला हवेत 'हे' 10 बदल

आता या काॅमन सर्विस सेंटरवर आधार कार्डही अपडेट करता येईल. म्हणजे फोटो किंवा पत्ता बदलणं. CSC शिवाय आधारसंबंधी सेवा बँकांच्या शाखा, पोस्ट आॅफिस आणि UIDAI ची मान्यता असलेल्या सेंटर्समध्ये आधारसंबंधी सेवांचा फायदा घेता येईल.

कोणी जबरदस्तीनं Aadhaar नंबर मागितला तर जावं लागेल तुरुंगात

CSC वर बंदी घातली होती

काही दिवसांपूर्वी 12 अंकी आधार नंबरच्या डेटा सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. तेव्हा या सेंटर्सकडून हे काम थांबवलं होतं.

Happy Father’s Day 2019 : या दिवसासाठी एका स्त्रीने केला होता 62 वर्ष संघर्ष

बँक आणि पोस्ट आॅफिसमध्येही मिळते ही सेवा

CSC शिवाय आधारसंबंधी सेवा बँकांच्या शाखा, पोस्ट आॅफिस आणि UIDAI ची मान्यता असलेल्या सेंटर्समध्ये आधारसंबंधी सेवांचा फायदा घेता येईल. व्हिलेज लेव्हल एन्टरप्रेन्योर्सनी आधारसंबंधी काम दिलं नाही तर सरकारविरोधात आंदोलनाची धमकी दिली होती.

उदयनराजेंची नक्कल करून रामराजेंनी उडवली खिल्ली, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 15, 2019 06:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading