जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Happy Father’s Day 2019 : या दिवसासाठी एका स्त्रीने केला होता 62 वर्ष संघर्ष

Happy Father’s Day 2019 : या दिवसासाठी एका स्त्रीने केला होता 62 वर्ष संघर्ष

Happy Father’s Day 2019 : या दिवसासाठी एका स्त्रीने केला होता 62 वर्ष संघर्ष

Father’s Day सुरूवात कशी, कुठे आणि कोणी केली हे तुम्हाला माहित आहेत का?

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 15 जून : दरवर्षी आपण जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी Father’s Day म्हणून साजरा करतो. जन्मदात्या वडिलांप्रती प्रेमभावना व्यक्त करण्यसाठी म्हणून हा दिवस जगभरात साजरा केला जातो. पण फार थोड्या लोकांना माहित असेल की या दिवसाची सुरूवात कशी, कुठे आणि कोणी सुरू केली. ‘फादर्स डे’ हा सर्वप्रथम 19 जून 1910 रोजी वॉशिंगटन येथे साजरा करण्यात आला अशी मान्यता आहे. हा दिवस साजरा करण्यामागे सोनोरा लुईस स्मार्ट डॉड या महिलेचा 62 वर्षांचा संघर्ष आहे. तुम्ही वारंवार तुमचा स्मार्टफोनमध्ये डोकावता का? लगेच सोडा ही सवय, कारण.. लहानपणीच सोनेराचं मातृछत्र हारपलं. त्यानंतर तिचे वडील विल्यम स्मार्ट हेच तिची  आई आणि वडील झाले. भरभरून प्रेम करत असातना त्यांनी सोनेराला कधीच आईची कमतरता भासू दिला नाही. 1909 मध्ये जेव्हा सोनेरा 16 वर्षांची होती तेव्हा तिला ‘मदर्स डे’ बाबत माहिती मिळाली. त्यानंतर वर्षातला एक दिवस वडिलांसाठीसुद्धा असायला हवा या विचाराने तिच्या मनात घर केलं. ‘मदर्स डे’ असू शकतो, मग ‘फादर्स डे’ का नाही? ही भूमिका स्पष्ट करत तिने अमेरिकेच्या शासनदरबारी याचिका दाखल केली. तब्बल 62 वर्षांच्या संघर्षानंतर म्हणजे 1924 मध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती केल्विन कोली यांनी ‘फादर्स डे’ ला सहमती दर्शवली. त्यानंतर 1966 मध्ये राष्ट्रपती लिंडन जॉन्सन यांनी सोनेराचे वडील विल्यम स्मार्ट यांच्या वाढदिवशी म्हणजेच जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा करण्याची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर जून 1910 मध्ये वॉशिंगटन येथे सर्वप्रथम ‘फादर्स डे’ साजरा करण्यात आला. रिझल्ट ओरिएन्टेड काम करणाऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहेत ‘या’ 7 गोष्टी जूनच्या तिसऱ्या रविवारी जगभरात साजरा केला जाणारा हा दिवस सुरूवातीला फक्त अमेरिकेत साजरा होत होता. या दिवसाचं महत्त्व पटल्यानंतर भारतातसुद्धा हा दिवस साजरा केला जाऊ लागला. जन्मदात्या वडिलांप्रती प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी हा दिवस मोठ्या आनंदाने भारतातसुद्धा साजरा केला जातो.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात