मराठी बातम्या /बातम्या /मनी /Lockdown : मोदी सरकारकडून 3 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता

Lockdown : मोदी सरकारकडून 3 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी 3 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी 3 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी 3 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली, 12 मे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी 3 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची (Economic Stimulus Package Worth Rs 3 Lakh Crore) घोषणा करण्याची शक्यता आहे. मीडिया अहवालांनुसार पुढील आठवड्यात या पॅकेजची घोषणा होऊ शकते. सरकारने पहिल्या टप्प्यात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. 14 एप्रिल रोजी लॉकडाऊनचा पहिला टप्प संपला आणि त्यानंतर दुसरा टप्पा 3 मे पर्यंत पूर्ण झाला. दरम्यान सध्या लॉकडाऊनता तिसरा टप्पा सुरू आहे. 17 मेपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. या लॉकडाऊनमुळे देशातील अनेक आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही व्यवहार सुरु करण्यास परवानगी दिल्यामुळे सामान्यांना मोठा दिलासा मिळाला होता. भारत आशिया खंडातील तीसरी मोठी अर्थव्यवस्था आहे. ही अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सरकारकडून आर्थिक पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता आहे.

(हे वाचा- लॉकडाऊनमध्ये फायद्याची ठरेल मोदी सरकारची ही योजना, मिळेल 3.75 लाखांची मदत)

मनीकंट्रोल ने बिझनेस स्टँडर्डचा हवाला देत अशी माहिती दिली आहे की, आर्थिक वर्ष 2021 मध्ये सरकारी उधारी 7.8 लाख कोटी रुपयांवरून 12 लाख कोटी रुपये करण्याचा निर्णयातून सरकारकडे जो पैसा येणार आहे त्याच्याच आधारे हे आर्थिक पॅकेज देण्यात येणार आहे. कोरोनाचे संकट किती दिवस आणि किती गंभीर असणार याबाबत कोणतीच शाश्वती नाही आहे, हे देखील पॅकेज देण्यामागचे दुसरे महत्त्वाचे कारण आहे. अर्थव्यवस्था हळूहळू सुरू होण्याबरोबरच छोट्आ उद्योगांना चालना देण्याचा सरकारचा मानस आहे. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार हे पॅकेज याआधीच्या 1.7 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजपेक्षा मोठे असेल

(हे वाचा-आज धावणार या 8 स्पेशल ट्रेन, वाचा काय आहेत वेळा आणि कोणत्या स्टेशनवर थांबणार)

Reuters ने दिलेल्या माहितीनुसार या पॅकेजमध्ये देशातील गरिबांप्रमाणेच त्यांचा विचार केला जाईल ज्यांची नोकरी गेली आहे किंवा जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे करामध्ये सूट देऊन छोट्या-मोठ्या कंपन्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याची अट घालून यासंदर्भात माहिती दिली आहे. कारण या मुद्द्यावर अद्याप चर्चा सुरू आहे.

पॅकेजमधील इतर महत्त्वाचे मुद्दे

-या पॅकेजअंतर्गत MSME साठी वर्किंग कॅपिटल लोन स्कीमची घोषणा होऊ शकते

-सामान्य जनतेच्या खात्यात पैसे पाठवण्यासाठी डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर स्कीम (DBT) चा विस्तार होऊ शकतो.

-मनरेगाअंतर्गत मिळणारी (MNREGA payments) मजूरी वाढवली जाऊ शकते

-PM-KISAN Scheme अंतर्गत काही घोषणा होण्याची शक्यता

-एव्हिएशन, टूरिझम, ट्रॅव्हल, आणि ऑटो या क्षेत्रांसाठी देखील पॅकेजमध्ये घोषणा होऊ शकतात.

संपादन - जान्हवी भाटकर

First published:

Tags: Nirmala Sitharaman, PM narendra modi