जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Life insurance घेताना करु नका चुका, अन्यथा...

Life insurance घेताना करु नका चुका, अन्यथा...

Life insurance घेताना करु नका चुका, अन्यथा...

लाइफ इन्शुरन्स हा भविष्य सुरक्षित करण्याचा तसेच गुंतवणुकीचा सोपा मार्ग आहे. परंतु अनेकदा लोक विमा खरेदी करताना छोट्या-छोट्या चुका करतात ज्या नंतर खूप हानिकारक ठरतात. ते टाळणे फार महत्वाचे आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 20 जानेवारी: जीवन विमा खरेदी करणे हा भविष्य सुरक्षित करण्याचा तसेच गुंतवणूक करण्याचा एक सोपा मार्ग आहे. वाढत्या जागरूकतेमुळे, अधिकाधिक लोक जीवन विमा खरेदी करत आहेत. परंतु जीवन विमा खरेदी करताना काही वेळा चुका देखील होतात. यातील बहुतेक या पुरेशी माहिती नसल्यामुळे होतात. विमा खरेदी करताना लोक सहसा कोणत्या चुका करतात ते जाणून घेऊया.

एकाच वेळी अनेक पॉलिसी

अनेक लोक एकाच वेळी अनेक पॉलिसी खरेदी करतात. असे केल्याने ते आणि त्यांचे कुटुंब अधिक सुरक्षित होईल असा लोकांचा गैरसमज आहे, पण हा विचार योग्य नाही. जीवन विम्याकडे केवळ अडचणीच्या वेळी उपयोगी पडण्याचे साधन म्हणून पाहिले जाऊ शकत नाही. अपघात झाला तेव्हाच त्याचा उपयोग होईल असे नाही. पॉलिसीधारकाला आवश्यक असलेली विमा रक्कम ही त्याच्या भविष्यातील आर्थिक उद्दिष्टांसाठी महत्त्वाची असते. तसेच त्यांना सध्या या विम्याचे पैसे देखील भरावे लागत असतात. यामुळे जास्त पॉलिसी काढून ठेवू नयेत. जुन्या पेंशन योजनेविषयी महत्त्वाची माहिती, रघुराम राजन यांचा मोठा खुलासा!  

पॉलिसी खरेदी करण्यास उशीर करणे

जेव्हा आपले सर्व काही चांगले चालू असते तेव्हा आपण विचार करतो की आपल्याला आता विम्याची काय गरज आहे. मात्र लोक इथेच चूक करतात. तरुण वयात विम्याचे हप्तेही कमी असतात आणि त्यांना मेच्योर होण्याचा पूर्ण लाभ मिळतो. वाढत्या वयानुसार, प्रीमियमची रक्कम देखील वाढते. ATM कार्ड नसले तरी तुम्ही करु शकता UPI अ‍ॅक्टिवेशन, ही आहे सोपी पद्धत  

मुलांच्या नावावर विमा

ही एक अतिशय सामान्य चूक आहे जी लोक सहसा करतात. जीवन विमा हे कुटुंबाचे भविष्यातील उत्पन्न आणि वर्तमान दायित्वांच्या नुकसानीपासून संरक्षण करण्याचे साधन आहे.

विम्याचा काळ कमी ठेवणे

प्रीमियम कमी करण्यासाठी, बहुतेक लोक कमी दायित्वासह मुदत विमा खरेदी करतात. परंतु जीवन विम्यामध्ये आदर्शपणे पॉलिसीधारकाच्या संपूर्ण आयुष्यातील जोखीम कव्हर केली पाहिजेत.

चुकीची माहिती देणे

जीवन विमा घेताना लोकांची आणखी एक गंभीर चूक म्हणजे पॉलिसीमध्ये स्वतःबद्दल चुकीची माहिती देणे. बरेच लोक त्यांच्या आरोग्याबद्दल किंवा सवयींबद्दल योग्य माहिती देत ​​नाहीत. सुरुवातीला ही फार मोठी समस्या वाटत नाही, परंतु नंतर अशा चुका पॉलिसी पूर्णपणे अवैध बनवू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात