नवी दिल्ली, 20 डिसेंबर: जर तुम्ही एखादे घर किंवा स्वस्त प्रॉपर्टी खरेदी करण्याची योजना आखत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या SBI (State Bank Of India) काही मालमत्तेचा ई-लिलाव (E-Auction) करणार आहे. यामध्ये रेसिडेंन्शिअल, कमर्शिअल आणि इंडस्ट्रियल याप्रकराच्या मालमत्तांचा समावेश आहे. तेव्हा तुम्ही यावेळी कमी पैशांमध्ये घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. ही ती प्रॉपर्टी आहे जी डिफॉल्टच्या लिस्टमध्ये आली आहे. डिफॉल्ट प्रॉपर्टीचा होतो लिलाव एखाद्या प्रॉपर्टीसाठी घेण्यात आलेलं कर्ज फेडलं नाही किंवा कोणत्याही कारणामुळे तर ती रक्कम बँकेला दिली नाही तर त्या सर्व लोकांची जमीन बँकेद्वारे ताब्यात घेतली जाते. एसबीआयकडून या प्रॉपर्टीचा लिलाव केला जातो. या लिलावातून बँक ती प्रॉपर्टी विकून संपूर्ण रक्कम वसूल करते.
येणाऱ्या काळात होणाल लिलाव पुढील 7 दिवसात - 758 (रेसिडेंशियल) 251 (कमर्शियल) 98 (इंडस्ट्रियल) पुढील 30 दिवसात- 3032 (रेसिडेंशियल) 844 (कॉमर्शियल) 410 (इंडस्ट्रियल) (हे वाचा- कोंबडी आधी की अंड नव्हे आता थेट मांस! ‘या’ देशात लॅबमध्ये तयार केलं जातंय चिकन ) याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही या लिंकवर व्हिजिट करू शकता >> bankeauctions.com/Sbi; >> sbi.auctiontiger.net/EPROC/; >> ibapi.in; and » mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp. (हे वाचा- कर्मचाऱ्यांच्या हक्काचं उल्लंघन; Apple च्या सप्लायर कंपनीने उचललं पाऊल ) बँकने दिलेल्या माहितीनुसार बँक मालमत्ता फ्रीहोल्ड किंवा लीजहोल्ड झाल्यानंतर स्थान आणि किती जागा आहे अशी माहिती असणारी सार्वजनिक नोटीस जारी करते. जर ई-लिलावच्या माध्यमातून तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करणार असाल तर बँकेमध्ये जाऊन प्रक्रिया आणि संबंधित प्रॉपर्टीबाबत माहिती घेऊ शकता. ही लिलावाची प्रक्रिया 30 डिसेंबर रोजी होणार आहे.