कोंबडी आधी की अंड नव्हे आता थेट मांस! 'या' देशात लॅबमध्ये तयार केलं जातंय चिकन

कोंबडी आधी की अंड नव्हे आता थेट मांस! 'या' देशात लॅबमध्ये तयार केलं जातंय चिकन

चिकन-मटण खायला अनेकांना आवडतं पण केवळ यामध्ये मुक्या प्राण्यांचा जीव जातो त्यामुळे अनेकजण मांस खाणं टाळतात. पण आता या देशात मुक्या प्राणी-पक्षांना मारल्याशिवाय मांस खाण्याचा आनंद घेता येणार आहे.

  • Share this:

सिंगापूर, 20 डिसेंबर: चिकन-मटण खायला अनेकांना आवडतं पण केवळ यामध्ये मुक्या प्राण्यांचा जीव जातो त्यामुळे अनेकजण मांस खाणं टाळतात. पण आता या देशात मुक्या प्राणी-पक्षांना मारल्याशिवाय मांस खाण्याचा आनंद घेता येणार आहे. एका रेस्टॉरंटमध्ये लॅबमध्ये तयार केलेलं कोंबडीचं मांस विकलं जात आहे. सिंगापूरमध्ये हा प्रयोग केला जातो आहे. ज्याठिकाणी अशाप्रकारचं चिकन विकलं जातं आहे, त्या रेस्टॉरंटचं नाव 1980 आहे. सिंगापूरमध्ये लॅबमध्ये बनवल्या जाणाऱ्या चिकनसाठी मंजुरी देण्यात आली आहे. अशी मान्यता देणारा सिंगापूर जगातील पहिला देश आहे. प्रयोगशाळेत कोंबडीच्या पेशींपासून तयार झालेल्या या मांसाला क्लीन मीट (Clean Meat) असं म्हणतात. याठिकाणी प्रयोगशाळेत चिकन बनवण्याचं काम इट जस्ट (Eat Just) या अमेरिकन स्टार्टअप कडून केलं जात आहे. सध्या चिकन नगेट्स  (Chicken Nuggets) तयार करण्यात आले होते.

हे चिकन नगेट्स खाणाऱ्या लोकांचं असं म्हणणं आहे की खरं चिकन आणि हे लॅबमध्ये बनवण्यात आलेलं चिकन याच्या टेक्सचरमध्ये काहीच फरक नाही आहे. चिकनची मागणी सर्वाधिक असताना पर्यावरण आणि जनावरांच्या बचावासाठी अशाप्रकारे लॅबमधील चिकन एक उत्तम पर्याय ठरू शकतो, मांसची कमतरता पूर्ण करण्यात हे लॅबमधील चिकन महत्त्वाची भूमिका निभावेल असं या स्टार्टअपचं म्हणणं आहे. मनीकंट्रोलने याबाबत वृत्त दिलं आहे.

(हे वाचा-पूर्वीपेक्षा घर बांधणं महागलं! वाचा काय आहे महागाई वाढण्याचं कारण)

फायनान्शिअल सर्व्हिस कंपनी बार्कली (Barkley) च्या मते प्रयोगशाळेत तयार केलेल्या चिकनचा हा व्यवसाय येणाऱ्या 10 वर्षात 140 अब्ज डॉलरचा होऊ शकतो. अर्थात हा व्यवसाय 1.4 ट्रिलियन डॉलरच्या मांस इंडस्ट्रीचा 10 टक्के हिस्सा बनू शकतो. गेल्या काही दिवसांपासून प्लँट बेस्ड मीटची मागणी वाढली आहे.  तयार करण्यात येणाऱ्या मांसाला प्लँट बेस्ड मीट म्हणतात, जे बर्गर पॅटी, नगेट्स आणि तुकड्यांच्या स्वरुपात मिळते. पण ते मांससारखे असले तरी ते मांस नसते.

(हे वाचा-आतापर्यंतच्या इतिहासातले 10 जबरदस्त शार्क हल्ले : थरकाप उडेल पाहून PHOTOS)

इट जस्टचे मांस प्लँट बेस्ड मीट नसून ते मांसच आहे. यामध्ये कोंबडीच्या मांसपेशीचा वापर करून ते बनवण्यात आलं आहे. कंपनीच्या मते जागतिक फूड इंडस्ट्रीसाठी हा एक महत्त्वाचा शोध आहे. कंपनीची अशी अपेक्षा आहे की इतर देशांमध्ये देखील त्यांना याकरता मंजुरी मिळेल. इस्रायल स्थित फ्यूचर मीट टेक्नॉलॉजी आणि बिल गेट्स संबंधित कंपनी मेमफिश मीट्स देखील लॅबमध्ये बनणाऱ्या मांसाच्या व्यवसायात उतरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या मते सामान्यांच्या खिशाला परवडणारे आणि स्वादाच्या बाबतीतही अव्वल असं मांस नागरिकांना खायला मिळेल.

पूर्णपणे सुरक्षित आहे की 'लॅबमधील चिकन'

सिंगापूर फूड एजन्सी (SFA) च्या मते एका एक्सपर्ट वर्किंग ग्रुपने इट जस्टच्या डेटाचं परिक्षण केलं आहे. यामध्ये मॅन्यूफॅक्चरिंग कंट्रोल आणि चिकन किती सुरक्षित आहे याची तपासणी करण्यात आली आहे. हे मांस तपासणीमध्ये सुरक्षित आढळून आलं आहे. Eat Just च्या मते त्यांनी या संपूर्ण चिकन तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये अँटिबायोटिक्सचा वापर केला नाही आहे. कंपनीच्या मते पारंपरिक चिकनच्या तुलनेत त्यांच्या लॅबमध्ये तयार करण्यात आलेल्या मांसात मायक्रोबायोलॉजिकल तत्त्व खूप कमी आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: December 20, 2020, 9:05 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading