नवी दिल्ली, 10 जुलै: कोरोना काळात (Coronavirus Pandemic) विविध बँकांची कामं सध्या ऑनलाइन सुरू आहे. ग्राहकांनी देखील ऑनलाइन प्रणालीचा वापर त्यांच्या दैनंदिन बँकिंग कामासाठी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान तरी देखील तुम्हाला काही आवश्यक कामासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता असेल तर बँकाच्या सुट्ट्या (Bank Holiday) तपासूनच बँकेला भेट द्या. अन्यथा तुमच्या कामाचा खोळंबा होऊ शकतो.
कोणत्या दिवशी आहेत सुट्ट्या?
आज (10 जुलै 2021) शनिवार आणि उद्या रविवार (11 जुलै 2021) रोजी साप्ताहिक सुट्टीनिमित्त बँका बंद असणार आहेत. शिवाय यानंतर विविध राज्यात मिळून सलग 9 दिवस वेगवेगळ्या सणांनिमित्त सुट्ट्या असणार आहेत. महाराष्ट्रातही यातील काही सुट्ट्या असणार आहेत. त्याचप्रमाणे 18 जुलै रोजी देखील रविवार असल्याने सुट्टी असेल. या दरम्यान केवळ 15 जुलै रोजी कोणत्याच राज्यात सुट्टी नाही आहे. हे बँक हॉलिडे प्रत्येक राज्यामध्ये (upcoming bank holidays list) वेगवेगळे असतात. ज्या राज्यात सुट्ट्या निश्चित करण्यात आल्या आहेत त्याठिकाणी बँकांचे कामकाज बंद राहील. त्यामुळे त्यानुसार योजना आखूनच तुम्ही बँकेमध्ये जा.
हे वाचा-Zomato Bug Bounty: बग शोधा आणि 3 लाख रुपये मिळवा! झोमॅटो देत आहे संधी
अशी आहे सुट्ट्यांची यादी
-10 जुलै 2021- दुसरा शनिवार
-11 जुलै 2021- रविवार
-12 जुलै 2021- सोमवार- कांग(राजस्थान), रथ यात्रा (भुवनेश्वर, इंफाळ)
-13 जुलै 2021- मंगळवार- भानू जयंती (शहीद दिवस- जम्मू आणि काश्मीर, भानू जयंती- सिक्कीम)
-14 जुलै 2021- बुधवार – द्रुकपा त्शेची (गंगटोक)
-16 जुलै 2021- गुरुवार- हरेला पूजा (डेहराडून)
-17 जुलै 2021- खारची पूजा (अगरतळा, शिलांग)
-18 जुलै 2021- रविवार
-19 जुलै 2021- गुरू रिंपोछेचे थुंगकर त्शेचू (गंगटोक)
-20 जुलै 2021- मंगळवार- ईद अल अधा(देशभर)
-21 जुलै 2021- बुधवार- बकरी ईद (पूर्ण देशात)
हे वाचा-SBI Alert: 10-11 तारखेला कोट्यवधी ग्राहकांना मिळणार नाहीत महत्त्वाच्या सेवा
याठिकाणी तपासता येईल सुट्ट्यांची यादी
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक सुट्ट्यांची यादी (Bank Holiday List) जारी केली जाते. https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx या वेबसाइटला भेट देऊन तुम्ही सुट्ट्यांची यादी तपासू शकता. प्रत्येत महिन्याची यादी याठिकाणी पाहता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bank, Bank details, Bank holidays, Money