नवी दिल्ली, 09 जुलै: फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो (Zomato) ने अशी घोषणा केली आहे की कंपनीची वेबसाइट किंवा अॅपमध्ये बग शोधणाऱ्याला 3 लाखांपर्यंतचे बक्षीस दिले जाईल. कंपनीच्या वक्तव्यानुसार, 'बग बाउंटी प्रोग्राम (Zomato Bug Bounty) कंपनीची सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीने केल्या जाणाऱ्या प्रयत्नातील महत्त्वाचा हिस्सा आहे. आम्ही अशी अपेक्षा व्यक्त करतो की यामुळे प्रत्येक हॅकरला कम्युनिटी बग शोधण्यात प्रोत्साहन मिळेल. आमच्या या प्रोग्रॅममध्ये सहभागी होण्यासाठी धन्यवाद. आम्ही तुमच्या अहवालाची प्रतीक्षा करू.'
झोमॅटोचे सिक्योरिटी इंजिनिअर यश सोढा यांनी बग बाउंटी प्रोग्रॅमबाबत माहिती दिली आहे.
Starting today, we’re increasing the rewards for @zomato's bug bounty program: $4,000 for critical, $2000 for high, and so on. We welcome your participation and look forward to your reports! Happy Hacking :) Find more details here: https://t.co/OSvNH1q6Mm
— Yash Sodha (@y_sodha) July 8, 2021
बगमुळे कंपनीच्या सिक्योरिटीला किती नुकसान होऊ शकतं याचा तपास CVSS (Common Vulnerability Scoring System) अंतर्गत केला जाईल. या आधारेच बक्षीस देण्यात येईल. जेव्हा CVSS 10.0 असेल तेव्हा तो शोधणाऱ्याला 4000 डॉलरचे बक्षीस देण्यात येईल. तर CVSS 9.5 असणारा बग शोधणाऱ्याला 3000 डॉलरचे बक्षीस मिळेल. झोमॅटो बग बाउंटी प्रोग्रॅममध्ये सहभागी होण्यासाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनची आवश्यकता असेल.
हे वाचा-Amazonवर या तारखेपासून स्वस्तात करा Shopping,स्मार्टफोनसह हजारो प्रोडक्ट्सवर सूट
14 जुलैला येणार झोमॅटोचा IPO
झोमॅटोचा आयपीओ (Zomato IPO) 14 जुलै रोजी खुला होणार असून 16 जुलै रोजी बंद होईल. कंपनीने या इश्यूकरता प्राइस बँड 72-76 रुपये निश्चित केला आहे. बऱ्याच काळापासून गुंतवणूकदार या आयपीओच्या प्रतीक्षेत होते. या आयपीओच्या माध्यमातून 9375 कोटी रुपयांचा फंड उभारण्याची कंपनीची योजना आहे. कंपनी 9000 रुपयांचे फ्रेश इश्यू जारी करेल तर 375 कोटींचे शेअर ऑफर फॉर सेल अंतर्गत विक्री केले जातील. कंपनीतील सर्वात मोठा गुंतवणूकदार असणारे इंफो एज ऑफर फॉर सेल (Offer for sale) मध्ये त्यांचा स्टेक विकत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Zomato