Home /News /money /

31 मार्चआधीच पूर्ण करा Pan card संबंधित हे काम; नाहीतर बसेल मोठा फटका

31 मार्चआधीच पूर्ण करा Pan card संबंधित हे काम; नाहीतर बसेल मोठा फटका

अजून एक महिना तुमच्या हातात आहे, त्यामुळे लवकरात लवकर हे Pan card चं हे काम उरकरण्याचं प्रयत्न करा.

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी :  आधार कार्ड (Aadhar card) आणि पॅन कार्ड (Pan card) हे दोन खूप महत्त्वाचे कागदपत्र आहेत. कोणत्याही प्रकारचा मोठा व्यवहार करायचा असल्यास ही दोन्ही कागदपत्रं खूप महत्त्वाची आहेत. पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची घोषणा यापूर्वीच केंद्र सरकारने केली आहे. सध्या पॅन नंबरला आधार क्रमांकाशी जोडण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2021 आहे. तुम्ही अद्याप तुमचा पॅन आधारशी लिंक केलेला नसेल तर आधी हे काम करा. अन्यथा 31 मार्चनंतर पॅन आधारशी जोडलं जाणार नाही त्यांचे पॅनकार्ड 1 एप्रिल 2021 पासून डिअॅक्टिव्हेट केलं जाणार आहे. यामुळं तुम्हाला याचा मोठा फटका बसण्याबरोबरच दंड देखील होणार आहे. 31 मार्चपूर्वी आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक न केल्यास कारवाई केली जाणार असल्याचं आयकर विभागानं म्हटलं आहे. पॅनकार्ड आधारशी लिंक न केल्यास ते बाद ठरते. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्च 2021 नंतर कोणतेही बाद झालेले पॅनकार्ड जर तुम्ही वापरले तर प्राप्तिकर कलम 272 बी अंतर्गत 10,000 रुपये दंड आकारला जातो. त्यामुळे जर करदात्यांनी 31 मार्चपर्यंत पॅन आणि आधार कार्ड लिंक केलं नाही तर पॅनकार्ड बाद होऊ शकतं. यामुळं तुम्हाला बँकेत व्यवहार देखील करता येणार नाहीत. हे वाचा - पगारवाढ मिळून सुद्धा हातात कमीच पडणार रक्कम; जाणून घ्या काय आहेत कारणं  पॅन कार्ड आणि आधार कार्ड सध्या बँकेत खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. 50 हजार रुपयांच्या वरील व्यवहारांसाठी बँकेत पॅन कार्ड दाखवावं लागतं. पण तुम्ही 31 मार्चपूर्वी हे काम न केल्यास बँकेत तुम्हाला पॅनकार्ड वापरता येणार नाही. आधार कार्ड आणि पॅनकार्ड लिंक करणे हे खूप सोपं असून तुम्ही घरबसल्या देखील आणि मेसेजच्या मदतीने करू शकता. हे वाचा - Good News: पुढच्या आर्थिक वर्षात अच्छे दिनची चाहूल; Moody चा अंदाज 1) आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला 567678 किंवा 56161 या क्रमांकावर मेसेज करायचा आहे. 2) यामध्ये 12 आकडी आधार क्रमांक आणि 10 आकडी पॅन क्रमांक टाकून तुम्ही वरील क्रमांकावर मेसेज पाठवू शकता. 3) यामध्ये UIDAIPANABCDXXXXXXXXXX ABCXXXXXXX या पद्धतीने तुम्ही मेसेज करू शकता. यात सुरुवातीचे आकडे हे आधार क्रमांक असून दुसरे आकडे हे पॅन क्रमांक आहेत.
Published by:Aiman Desai
First published:

Tags: Aadhar card, Aadhar card link, March 2021, Pan card, Personal finance

पुढील बातम्या