Home /News /money /

पगारवाढ मिळून सुध्दा हातात कमीच पडणार रक्कम; जाणून घ्या काय आहेत कारणं

पगारवाढ मिळून सुध्दा हातात कमीच पडणार रक्कम; जाणून घ्या काय आहेत कारणं

नवीन आर्थिक वर्षात बहुतेक कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांच्या पगाराची वाढ करत असतात . या वेळीही पगारवाढ होईल, परंतु नव्या कामगार संहितेमुळे टेक होम पगार वाढण्याची शक्यता कमी आहे.

नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी : एप्रिल महिना सुरू होताच नव्या अर्थिक वर्षात अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ (Salary Hike) देतात. त्यामुळे एप्रिल महिन्याची चाहूल लागताच कर्मचाऱ्यांचे लक्ष पगारवाढीकडे असतं. परंतु आता केंद्र सरकारच्या नवीन नियमांमुळे टेक होम सॅलरीवर (Take Home Salary) परिणाम होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या नव्याने येत असलेल्या कामगार कायद्यामुळे (Labour Law) तुमची सीटीसी नव्याने तयार केली जाणार आहे. या अंतर्गत कंपन्यांना कामगारांचे बेसिक वेतन (Basic Salary) किमान 50 टक्के करणं आवश्यक आहे. परिणामी तुमचे पीएफमधील योगदान वाढणार आहे. याचा अर्थ असा की जेव्हा कंपनी तुम्हाला पगारवाढ देईल तेव्हा ही वाढ पीएफ योगदानात (PF Contribution) अॅडजेस्ट होऊ शकते. यामुळे पगारवाढ होऊनही तुमच्या हातात पडणारी रक्कम किंवा टेक होम सॅलरीत वाढ होणार नाही. जरी ही वाढ झाली तरी ती अल्पच असेल. नव्या कायद्यामुळे होणार पगारावर परिणाम एआॅनचे भारतातील परफॉरमन्स आणि रिवॉर्ड बिझनेस भागीदार, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन सेठी यांनी सांगितले, की नव्या कामगार कायद्यानुसार वेतनाच्या नव्या व्याख्येला अनुसरुन कंपन्यांना ग्रॅच्युईटी, सुट्टीच्या बदल्यात पैसे आणि भविष्य निर्वाह निधीकरिता (PF) मोठ्या प्रमाणात तजवीज करावी लागणार आहे. या कायद्यातील तरतुदींचा अभ्यास केल्यानंतर कंपन्या वर्षातील दुसऱ्या सहामाहीत आपल्या पगाराच्या बजेटचे पुनरावलोकन करतील.

सीटीसीवर अवलंबून असेल टेक होम सॅलरी सेठी म्हणाले, की भारतातील बहुतांश मोठ्या कंपन्या कामगारांना 35-40 टक्के सीटीसी (CTC - Cost To Company) बेसिक पगार म्हणून देतात, त्यामुळे त्यांच्यावर कायद्याचा फारसा परिणाम होणार नाही. जुन्या जागतिक इंजिनिअरिंग कंपन्या या बेसिक पगार हा एकूण पगाराच्या 25 टक्के देतात, अशा कंपन्यांवर नव्या कायद्यामुळे मोठा परिणाम होऊ शकतो.

अवश्य वाचा -     तुम्ही सिंगल आहात? वाईट कशाला वाटून घेता, एकटं असण्याचे हे आहेत अनोखे फायदे मागील वर्षाच्या तुलनेत अधिक कंपन्या वेतन वाढवतील : सर्व्हे ग्लोबल प्रोफेशनल सर्व्हिसेस कंपनी एआॅन पीएलसीने मंगळवारी भारतातील वेतनवाढीबाबतचा आपला ताजा अहवाल जाहिर केला. भारतातील कंपन्या 7.7 टक्के वेतनवाढ देऊ शकतात, असा अंदाज या अहवालातून व्यक्त करण्यात आला. ब्रिक (BRIC- ब्राझील, रशिया, भारत आणि चीन) देशांमध्ये तुलनेने ही वाढ सर्वाधिक असेल. मागील वर्षी कर्मचाऱ्यांच्या पगारात 6.1 टक्के वाढ झाली होती. या सर्व्हेत सहभागी कंपन्यांपैकी 88 टक्के कंपन्यांनी 2021मध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करणार असल्याचे सांगितले. 2020 मध्ये असे सांगणाऱ्या कंपन्यांचे प्रमाण 75 टक्के होते. या सर्व्हेत 20 उद्योग क्षेत्रामधील 1200 हून अधिक कंपन्यांच्या मताचा समावेश आहे. या सर्व्हेनुसार चांगल्या पगारवाढीचे संकेत मिळत आहेत. त्याचप्रमाणे याउलट देखील स्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे.
Published by:news18 desk
First published:

Tags: India, Money, Pf, Salary

पुढील बातम्या