मराठी बातम्या /बातम्या /मनी /Good News: पुढच्या आर्थिक वर्षात अच्छे दिनची चाहूल; Moody's 2020 मध्ये विकास दर वाढीचा अंदाज

Good News: पुढच्या आर्थिक वर्षात अच्छे दिनची चाहूल; Moody's 2020 मध्ये विकास दर वाढीचा अंदाज

Moodies Report 2021 कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी भारताचा जीडीपी 7 टक्क्यांपर्यंत घसरेल असा अंदाज मूडीजनं व्यक्त केला आहे, पण कोरोना लस आल्याने आणि उद्योगधंदे जोमााने सुरू झाल्याने अर्थव्यवस्था झपाट्यानं प्रगती करेल, असंही म्हटलं आहे.

Moodies Report 2021 कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी भारताचा जीडीपी 7 टक्क्यांपर्यंत घसरेल असा अंदाज मूडीजनं व्यक्त केला आहे, पण कोरोना लस आल्याने आणि उद्योगधंदे जोमााने सुरू झाल्याने अर्थव्यवस्था झपाट्यानं प्रगती करेल, असंही म्हटलं आहे.

Moodies Report 2021 कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी भारताचा जीडीपी 7 टक्क्यांपर्यंत घसरेल असा अंदाज मूडीजनं व्यक्त केला आहे, पण कोरोना लस आल्याने आणि उद्योगधंदे जोमााने सुरू झाल्याने अर्थव्यवस्था झपाट्यानं प्रगती करेल, असंही म्हटलं आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी: जागतिक पतमानांकन संस्था मूडीजनं (Moody) आर्थिक वर्ष 2021 मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेचा ( Indian Economy) विकास दर (GDP) 7 टक्क्यांपर्यंत कमी होण्याचा अंदाज वर्तवला होता. पुढच्या वर्षात मात्र ही तूट भरून काढत अर्थव्यवस्था सुधारेल असा अंदाज Moodys ने वर्तवला आहे. पुढील आर्थिक वर्ष 2021-2022 साठी अर्थव्यवस्था झपाट्यानं प्रगती करत तब्बल 13.7 टक्क्यांचा दर गाठेल असं म्हटलं आहे. या आधी मूडीजनं (Moody's report 2020) विकास दर 10.08 टक्के राहील, असं भाकीत केलं होतं, तर चालू आर्थिक वर्षात भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्न अर्थात जीडीपीचा (GDP) दर 10.06 टक्के राहील, असा अंदाज वर्तवला होता.

Moody - मूडीज ही जागतिक स्तरावर पतनिर्धारणाचा अंदाज वर्तवणारी संस्था आहे. अर्थविषयक आणि व्यापाराचा अंदाज घेऊन या संस्थेने पुढच्या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर वाढेल, GDP मध्ये वाढ होईल, असा अंदाज वर्तवला आहे.

बिझनेस टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, मूडीजच्या फेब्रुवारी 2021 मध्ये सादर करण्यात आलेल्या ‘ग्लोबल मॅक्रो आऊटलूक -2021-2022’ मध्ये हे भाष्य करण्यात आलं आहे. जगभरात पसरलेल्या कोरोना संकटामुळं (Corona Pandemic) जगातील सर्वात प्रदीर्घ आणि कठोर लॉकडाऊन (Lockdown) भारतात करण्यात आला होता. त्यामुळं आर्थिक वर्ष 2020-21 च्या दुसऱ्या तिमाहीत जीडीपीत सर्वात तीव्र घसरण नोंदवण्यात आली. तरीही भारतीय अर्थव्यवस्था यातून वेगानं बाहेर पडली आहे. 2020च्या अखेरीस कोरोना येण्यापूर्वी अर्थव्यवस्थेची जशी स्थिती होती, तशी स्थिती आता आली आहे. त्यामुळं 2021साठी अर्थव्यवस्थेत अधिक चांगली सुधारणा होण्याची शक्यता दिसत आहे, या आधारावर विकास दराचा सुधारीत अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मार्च 2021 अखेरीस संपणाऱ्या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर 7 टक्के राहील, तर पुन्हा सगळं सुरळीत झाल्यानंतर पुढील आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था 13.7 टक्क्यांचा दर गाठेल अशी अपेक्षा असल्याचं मूडीजच्या इन्व्हेस्टर्स सर्व्हिस विभागाचे सहायक व्यवस्थापकीय संचालक जेने फांग यांनी म्हटलं आहे.

उद्या केंद्र सरकार चालू आर्थिक वर्षातील ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीतील (Fiscal Quarter) जीडीपीची आकडेवारी जाहीर करेल. आर्थिक वर्षाच्या (Fiscal Year) या तिसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेचा विकासदर सकारात्मक नोंदवला गेला असेल, असा अनेक संस्थांचा अंदाज आहे. डीबीएस बँकेनं नुकत्याच जाहीर अहवालात या तिसऱ्या तिमाहीत जीडीपीचा दर 1.3 टक्के राहील, असं म्हटलं आहे. कोरोनाची साथ आणि लॉकडाऊनमुळे जून आणि सप्टेंबर 2020 अखेर संपलेल्या अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत भारताचा विकासदर मोठ्या प्रमाणत घसरून उणे झाला होता. पहिल्या तिमाहीत तो उणे 24 टक्के तर दुसऱ्या तिमाहीत तो उणे 7.5 टक्के होता.

 अवश्य वाचा -    पगारवाढ मिळून सुध्दा हातात कमीच पडणार रक्कम; जाणून घ्या काय आहेत कारणं

अर्थसंकल्पापूर्वी 2021-22 साठी जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षणातही (Economic Survey) कोरोना साथ आणि लॉकडाऊनमुळे डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेत 2021-22 या आर्थिक वर्षात वेगाने पुनरुज्जीवन होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. येत्या एक एप्रिल पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये जीडीपी विकास दर 11 टक्के राहण्याचा अंदाज या सर्वेक्षणात नोंदवण्यात आला होता. भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) हा दर 10.5 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला होता. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंही (IMF) आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये भारताचा विकास दर 11.5 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

First published:
top videos

    Tags: Economy, Gdp, India, Lockdown