• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • CarTrade IPO allotment: तुम्हाला मिळाले का कारट्रेडचे शेअर्स? सोप्या पद्धतीने करा चेक

CarTrade IPO allotment: तुम्हाला मिळाले का कारट्रेडचे शेअर्स? सोप्या पद्धतीने करा चेक

Car Trade च्या आयपीओमध्ये CarTrade IPO allotment) जर तुम्ही पैसे गुंतवले असतील तर तुमच्या खात्यात आज शेअर्स जारी केले जातील. तुम्ही BSE च्या अधिकृत वेबसाइटवरुन किंवा रजिस्ट्रारच्या वेबसाइटवरुन तुम्ही हे शेअर्स तुम्हाला मिळाले आहेत की नाही तपासू शकता

 • Share this:
  नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर: कार आणि बाइक यांची विक्री करणारी ऑनलाइन कंपनी Car Trade च्या आयपीओमध्ये (CarTrade IPO allotment) जर तुम्ही पैसे गुंतवले असतील तर तुमच्या खात्यात आज शेअर्स जारी केले जातील. तुम्ही BSE च्या अधिकृत वेबसाइटवरुन किंवा रजिस्ट्रारच्या वेबसाइटवरुन तुम्ही हे शेअर्स तुम्हाला मिळाले आहेत की नाही तपासू शकता. CarTrade Tech ने 2998.5 कोटी रुपयांचा आयपीओ बाजारात आणला आहे. 7 ते 9 ऑगस्ट दरम्यान सब्सक्रिप्शनसाठी हा आयपीओ खुला करण्यात आला होता. कार ट्रेड टेकने आयपीओचा प्राइस बँड  1,585-1,618 रुपये प्रति शेअर निश्चित केला होता. कंपनीचे शेअर्सचे वाटप आज 17 ऑगस्ट 2021 रोजी आहे. दरम्यान ज्या गुंतवणूकदारांना शेअर्स मिळणार नाहीत, त्यांचे पैसे 2 दिवसांत त्यांच्या खात्यात परत केले जातील. जाणून घ्या कशाप्रकारे तु्म्ही आयपीओसाठी केलेल्या अर्जाचे स्टेटस तपासता येईल. रजिस्ट्रारच्या वेबसाइटवरुन तपासा अलॉटमेंट -सर्वात आधी तुम्हाला या linkintime.co.in/MIPO/Ipoallotment.html लिंकवर भेट द्यावी लागेल -यानंतर ड्रॉपडाउन करून आयपीओचं नाव सिलेक्ट करा -यानंतर DP ID किंवा Client ID किंवा PAN प्रविष्ट करा -तुमच्याकडे अ‍ॅप्लिकेशन क्रमांक असेल तर तो टाइप करा हे वाचा-Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत घसरण तर चांदी महागली; काय आहे आजचा भाव? -आता  DP ID किंवा Client ID असेल तर NSDL किंवा CDSL पैकी तुमचा डिपॉझिटरी निवडा आणि तुमचा DP ID किंवा Client ID प्रविष्ट करा -यानंतर Captcha सबमिट करा -याठिकाणी तुम्हाला अलॉटमेंटची संपूर्ण माहिती मिळेल -तुम्हाला शेअर मिळाला नसेल तर दोन दिवसात रिफंड मिळून जाईल BSE वेबसाइटवरुन तपासा अलॉटमेंट -सर्वात आधी  https://www.bseindia.com/investors/appli_check.aspx या लिंकला भेट द्या -यानंतर इक्विटीवर सिलेक्ट करा आणि ड्रॉपडाउन करा -त्यानंतर Issue Name (CarTrade IPO)  निवडा हे वाचा-Petrol price today: महिनाभर इंधन दरात बदल नाही, अद्यापही मुंबईत पेट्रोल शंभरीपार -याठिकाणी अ‍ॅप्लिकेशन क्रमांक,  DP ID किंवा Client ID किंवा PAN प्रविष्ट करा -यानंतर सर्च बटनवर क्लिक करा -सर्व तपशील भरल्यानंतर अ‍ॅप्लिकेशन स्टेटस मिळेल
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: