• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत घसरण तर चांदी महागली; काय आहे आजचा भाव?

Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत घसरण तर चांदी महागली; काय आहे आजचा भाव?

या महिन्यात सोन्याच्या किंमतीत (Gold price today) सुरू असणारी घसरण अजूनही सुरूच आहे. महिन्याचा सुरुवातीपासूनच ही घसरण सुरू आहे. तुम्ही देखील सोनंखरेदीचा विचार करत असाल तर त्याआधी लेटेस्ट दर तपासून घ्या.

  • Share this:
    नवी दिल्ली, 17 ऑगस्ट: या महिन्यात सोन्याच्या किंमतीत (Gold price today) सुरू असणारी घसरण अजूनही सुरूच आहे. महिन्याचा सुरुवातीपासूनच ही घसरण सुरू आहे. तुम्ही देखील सोनंखरेदीचा विचार करत असाल तर त्याआधी लेटेस्ट दर तपासून घ्या. एमसीएक्सवर (Multi commodity exchange MCX) सोन्याच्या किंमतीमध्ये किरकोळ घसरण पाहायला मिळाली आहे. एमसीएक्सवर आज सोन्याचे दर 47,223 रुपये प्रति तोळावर आहेत. तर चांदीच्या दरात 0.22 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. चांदीचे दर (Silver Price today) 0.22 टक्के ने वाढल्याने 63,598 रुपये प्रति किलोग्रॅम झाले आहेत. गेल्या आठवड्यात सोन्याचे दरात किरकोळ वाढ पाहायला मिळाली होती. या रिकव्हरी आधी सोन्याचे दर चार महिन्याच्या निचांकी पाचळीवर अर्थात  45,600 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. तर गेल्यावर्षी सोन्याने  56,200 रुपये प्रति तोळाचा रेकॉर्ड स्तर गाठला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजाराबाबत बोलायचे झाले तर सोन्याचे दर  1,787.90 डॉलर प्रति औंसवर स्थिर आहेत. तर चांदीचे दर 0.3 टक्के वाढीमुळे  23.89 डॉलर प्रति औंसवर आहेत. तर प्लॅटिनमच्या किंमतीत 0.1 टक्क्याने वाढ होऊन दर 1,023.52 डॉलर आहेत. हे वाचा-पर्यटनाची भुरळ घालणाऱ्या लोन स्किम स्वीकारण्याआधी नियम वाचा; नाहीतर पस्तवाल! मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही  www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता. हे वाचा-सोन्याचे दर कमी होण्याचा अंदाज! जाणून घ्या किती स्वस्त होणार सोनं? सोनं शुद्ध आहे हे कसं ओळखाल? जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: