नवी दिल्ली, 17 ऑगस्ट: पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत आज बदल झाले नसले तरी अद्यापही दर सामान्यांना न परवडणारेच आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol-Diesel Price Today) जारी केले आहेत. आज 17 ऑगस्ट रोजी देखील इंधनाच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. त्यामुळे आज सलग 31व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतेही बदल झालेले नाही आहेत. IOCL च्या वेबसाइटनुसार, मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 107.83 रुपये प्रति लीटर तर डिझेलचे दर 97.45 रुपये प्रति लीटर आहेत. मे महिन्यानंतर सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ पाहायला मिळाली होती. मात्र त्यानंतर आता 31 दिवस पेट्रोल आणि डिझेलचे स्थिर आहेत. त्याआधी 42 दिवस झालेल्या इंधनवाढीबाबत बोलायचे झाले कर, पेट्रोल जवळपास 11.52 रुपये प्रति लीटरने महागले होते. तर डिझेल 9.08 रुपये प्रति लीटरने महागले होते. जुलैमध्ये शेवटचे बदलले होते दर 18 जुलैपासून इंधनाचे दर स्थिर आहेत. शेवटी पेट्रोलचे दर 17 जुलै रोजी वधारले होते. 17 जुलै रोजी पेट्रोलच्या दरात 30 पैशांची वाढ पाहायला मिळाली होती, तर डिझेलचे दर स्थिर होते हे वाचा- आता ग्राहकांना सहज मिळणार लोन; TATA मोटर्सनं बँक ऑफ महाराष्ट्रसोबत केला करार पेट्रोल-डिझेलचे आजचे दर >> दिल्ली - पेट्रोल 101.84 रुपये आणि डिझेल 89.87 रुपये प्रति लीटर » मुंबई - पेट्रोल 107.83 रुपये और डीजल 97.45 रुपये प्रति लीटर » चेन्नई - पेट्रोल 101.49 रुपये आणि डिझेल 94.39 रुपये प्रति लीटर » कोलकाता - पेट्रोल 102.08 रुपये आणि डिझेल 93.02 रुपये प्रति लीटर » भोपाळ - पेट्रोल 110.20 रुपये आणि डिझेल 98.67 रुपये प्रति लीटर » बंगळुरु - पेट्रोल 105.25 रुपये आणि डिझेल 95.26 रुपये प्रति लीटर » लखनऊ -पेट्रोल 98.92 रुपये आणि डिझेल 90.26 रुपये प्रति लीटर » पाटणा - पेट्रोल 104.25 रुपये आणि डिझेल 95.57 रुपये प्रति लीटर » जयपूर - पेट्रोल 108.71 रुपये आणि डिझेल 99.02 रुपये प्रति लीटर » गुरुग्राम - पेट्रोल 99.46 रुपये आणि डिझेल 90.47 रुपये प्रति लीटर हे वाचा- या 10 खासगी बँका देतायंत FDवर सर्वाधिक व्याज, गुंतवणूक करण्याआधी इथे तपासा यादी दररोज सकाळी 6 वाजता बदलतात इंधनाचे दर दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, या आधारावर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत असतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.