मराठी बातम्या /बातम्या /मनी /

16 जुलैपर्यंत खरेदी करा स्वस्त सोनं, मोदी सरकार डिस्काउंटसह देतंय गुंतणुवकीची संधी; काय सांगतात तज्ज्ञ?

16 जुलैपर्यंत खरेदी करा स्वस्त सोनं, मोदी सरकार डिस्काउंटसह देतंय गुंतणुवकीची संधी; काय सांगतात तज्ज्ञ?

तुम्ही जर सोनं खरेदीचा विचार करत असाल तर 16 जुलैपर्यंत तुमच्याकडे चांगली संधी आहे. कारण तुम्ही या तारखेपर्यंत स्वस्तात सोनं खरेदी करू शकता.

तुम्ही जर सोनं खरेदीचा विचार करत असाल तर 16 जुलैपर्यंत तुमच्याकडे चांगली संधी आहे. कारण तुम्ही या तारखेपर्यंत स्वस्तात सोनं खरेदी करू शकता.

तुम्ही जर सोनं खरेदीचा विचार करत असाल तर 16 जुलैपर्यंत तुमच्याकडे चांगली संधी आहे. कारण तुम्ही या तारखेपर्यंत स्वस्तात सोनं खरेदी करू शकता.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 13 जुलै: तुम्ही जर सोन्यामध्ये गुंतवणूक  (Investment in Gold) करण्यासाठी स्वस्त मार्ग शोधत असाल, तर सरकारची सॉव्हरेन होल्ड बाँड स्कीम (Sovereign Gold Bond scheme) तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.  12 जुलैपासून सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीम 2021-22 ची चौथी सीरिज (Sovereign Gold Bond Scheme 2021-22 – Series IV) सब्सक्रिप्शनसाठी खुली झाली आहे. या अंतर्गत स्वस्त सोन्याची विक्री होईल. ही विक्री 16 जुलैपर्यंत होणार आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या या सीरिजमधील सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 4,807 रुपये निश्चित करण्यात आली आहे. सरकारच्या वतीने आरबीआय (Reserve Bank of India) सॉव्हरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond SGB) जारी करतं. तुम्ही जर गुंतवणूक करणार असाल तर जाणून घ्या सविस्तर माहिती.

काय आहे तज्ज्ञांचं मत?

इनक्रेड वेल्थमधील गुंतवणूक प्रमुख योगेश कलवानी सांगतात की, 'गोल्ड बाँड किंवा गोल्ड फंड किंवा गोल्ड ईटीएफ, हे तीनही सोन्यामध्ये गुंतवणुकीचे सर्वात चांगले पर्याय आहेत. कारण या सर्वांमध्ये कमी जोखीम आहे आणि रिटर्न चांगला मिळतो. सॉव्हरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक हा फिजिकल गोल्डचा चांगला पर्याय आहे.

हे वाचा-Zomato पाठोपाठ ही कंपनी देत आहे कमाईची संधी! या तारखेपासून IPOमध्ये करा गुंतवणूक

मिलवुड केन इंटरनॅशनलचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निश भट्ट यांनी असे म्हटले आहे की, 'यामुळे गुंतवणुकदारांचा सोन्याचे बार, नाणी खरेदी करणं, ते बाळगणं आणि विकणं यासाठी होणारा खर्च वाचेल. यामुळे गुंतवणुकदारांची चांगली कमाई होईल.'

वाचा काय आहेत सॉव्हरेन गोल्ड बाँडची वैशिष्ट्य?

-कोणतीही व्यक्ती, हिंदू अविभाजित परिवार (HUF), ट्रस्ट, विद्यापीठ आणि धर्मसंस्था बाँडच्या सदस्यत्वासाठी अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

-तुम्ही सर्व कमर्शिअल बँका (आरआरबी, लघू वित्त बँक व्यतिरिक्त), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, निवडण्यात आलेले पोस्ट आणि एनएसई तसच बीएसईच्या माध्यमातून याची खरेदी करू शकता

-सरकारकडून आरबीआयच्या (Reserve Bank of India RBI) माध्यमातून हे सॉव्हरेन गोल्ड बाँड जारी केले जातात. या स्कीममध्ये एका आर्थिक वर्षात एखादी व्यक्ती जास्तीत जास्त 4 किलो तर कमीत कमी 1 ग्रॅम गोल्ड बाँडची खरेदी करू शकते. शिवाय ट्रस्ट किंवा यासारख्या संस्था जास्तीत जास्त 20 किलो बाँडची खरेदी करू शकतात. याकरता जारी होणारे अर्ज 1 ग्रम किंवा त्याच्या पटीमध्ये असतात.

-हे बाँड खरेदी करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा (Buy Gold Online) वापर केल्यास तुम्हाला आणखी सूट देखील मिळणार आहे. सोनेखरेदीसाठी ऑनलाइन अर्ज आणि पेमेंट केल्यास गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट देखील मिळेल. अर्थात ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांना सॉव्हरेन गोल्ड बाँड 4,757 रुपये प्रति ग्रॅमने खरेदी करता येतील.

हे वाचा-उद्यापासून आहे बंपर कमाईची संधी, 14040 रुपयांची गुंतवणूक करून व्हाल मालामाल

-बाँडवर 2.50 टक्के प्रति वर्ष व्याज निश्चित करण्यात आलं आहे. व्याज गुंतवणुकदाराच्या बँक खात्यात अर्ध-वार्षिक जमा केलं जात आणि अंतिम व्याज मुळ रकमेसह मॅच्युरिटीनंतर दिलं जातं. मॅच्युरिटीवर सॉव्हरेन गोल्ड बाँड टॅक्स फ्री होतात.

-याचा मॅच्युरिटी पीरिएड 8 वर्षांचा असतो. मात्र तरी देखील 5 वर्षांनी प्रीमॅच्यूअर विड्रॉल करता येते.

First published:

Tags: Gold, Gold bond, Gold price, Rbi, Rbi latest news, Sovereign gold bond scheme