Home /News /money /

Zomato IPO: उद्यापासून आहे बंपर कमाईची संधी, 14040 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा चांगला रिटर्न

Zomato IPO: उद्यापासून आहे बंपर कमाईची संधी, 14040 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा चांगला रिटर्न

फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या (Zomato) इनिशिअल पब्लिक ऑफरिंग (Initial Public Offering) अर्थात आयपीओ (IPO) च्या माध्यमातून चांगली कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे.

    नवी दिल्ली, 13 जुलै: फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या (Zomato) इनिशिअल पब्लिक ऑफरिंग (Initial Public Offering) अर्थात आयपीओ (IPO) च्या माध्यमातून चांगली कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. झोमॅटोचा आयपीओ (Zomato IPO) 14 जुलै रोजी खुला होणार असून 16 जुलै रोजी बंद होईल. यामध्ये तुम्ही 14040 रुपयांची गुंतवणूक करून चांगली कमाई करू शकता. उद्यापासून हा आयपीओ सब्सक्रिप्शनसाठी खुला होत आहे. जाणून घ्या 14 ते 16 जुलै दरम्यान तुम्ही कशाप्रकारे बंपर कमाई करू शकता. गुंतवणूकदारांना या आयपीओमध्ये 14040 रुपयांची गुंतवणूक करावी लागे, ज्या बदल्यात तुम्हाला कंपनीचे 195 शेअर्स मिळतील. या आयपीओच्या माध्यमातून 9375 कोटी रुपयांचा फंड उभारण्याची कंपनीची योजना आहे. कंपनी 9000 रुपयांचे फ्रेश इश्यू जारी करेल तर 375 कोटींचे शेअर ऑफर फॉर सेल अंतर्गत विक्री केले जातील. हा आयपीओ महत्त्वाचा आहे कारण एसबीआय कार्डनंतर झोमॅटोचा हा सर्वात मोठा आयपीओ असेल. गेल्यावर्षी एसबीआय कार्डने आणलेला आयपीओ 10,355 कोटी रुपयांचा होता. गेल्या चार वर्षातील हा दुसरा मोठा आयपीओ ठरणार आहे. काय आहे प्राइस बँड? झोमॅटोचा आयपीओ (Zomato IPO) 14 जुलै रोजी खुला होणार असून 16 जुलै रोजी बंद होईल. कंपनीने या इश्यूकरता प्राइस बँड 72-76 रुपये निश्चित केला आहे. हे वाचा-PM Kisan: लवकरच खात्यामध्ये येतील 2000 रुपये, तपासा तुम्हाला लाभ मिळणार की नाही? किती आहे लॉट साइझ? यामध्ये एक लॉट साईझ 195 शेअर्सची आहे. म्हणजे तुम्हाला किमान 195 शेअर्स खरेदी करावे लागतील. दोन लॉट बुक केल्यास तुम्हाला 290 शेअर्स मिळतील. कसं आहे कंपनीचं रिपोर्ट कार्ड? आर्थिक वर्ष 2020 मध्ये झोमॅटोचं उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढून 2,960 कोटी होतं. तर EBITDA लॉस 2,200 कोटी होता. फेब्रुवारीमध्ये कंपनीने टायगर ग्लोबल, कोरा आणि अन्य फर्म्सच्या माध्यमातून जवळपास 1800 कोटींचा फंड उभारला होता. यानंतर कंपनीचं व्हॅल्यूएशन जवळपास 40 हजार कोटी झालं होतं कोण असणार आयपीओचा लीड मॅनेजर? या आयपीओमध्ये कोटक महिंद्रा कॅपिटल, मॉर्गन स्टेनली इंडिया, क्रेडिट लुईस सिक्योरिटीज या इश्यूमधील ग्लोबल को-ऑर्डिनेटर आणि लीड मॅनेजर आहेत. BofA सिक्योरिटीज आणि सिटीग्रुप ग्लोबल मार्केट मर्चेंट बँकर आहेत. हे वाचा-Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, 10000 रुपयांनी स्वस्त आहे सोनं 2008 मध्ये सुरू झाली होती कंपनीची सुरुवात Zomato ची सुरुवात 2008 मध्ये झाली होती. कंपनीची मुख्य स्पर्धा Swiggy आणि Amazon शी आहे. रॉयटर्सच्या माहितीनुसार कंपनी 9000 रुपयांचे फ्रेश इश्यू जारी करेल तर 375 कोटींचे शेअर ऑफर फॉर सेल अंतर्गत विक्री केले जातील. (डिस्क्लेमर: बाजारातील गुंतवणूक ही बाजार जोखमीच्या अधीन आहे. पैसे गुंतवण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. https://lokmat.news18.com/वरून कोणालाही पैसे गुंतविण्याचा सल्ला दिला जात नाही)
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Investment, Savings and investments, Zomato

    पुढील बातम्या