मराठी बातम्या /बातम्या /मनी /

रोज केवळ 1 रुपयाची बचत करून कमावू शकता मोठा नफा, वाचा कसे मिळवाल 15 लाख

रोज केवळ 1 रुपयाची बचत करून कमावू शकता मोठा नफा, वाचा कसे मिळवाल 15 लाख

मुलींच्या (Girl Child) भविष्यासाठी तरतूद करण्यासाठी या सरकारी योजनेबद्दल तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. यामध्ये तुम्ही कमी गुंतवणूक करून चांगला नफा मिळवू शकता.

मुलींच्या (Girl Child) भविष्यासाठी तरतूद करण्यासाठी या सरकारी योजनेबद्दल तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. यामध्ये तुम्ही कमी गुंतवणूक करून चांगला नफा मिळवू शकता.

मुलींच्या (Girl Child) भविष्यासाठी तरतूद करण्यासाठी या सरकारी योजनेबद्दल तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. यामध्ये तुम्ही कमी गुंतवणूक करून चांगला नफा मिळवू शकता.

नवी दिल्ली, 27 मे: मुलींच्या (Girl Child) भविष्यासाठी तरतूद करण्यासाठी या सरकारी योजनेबद्दल तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. यामध्ये तुम्ही कमी गुंतवणूक करून चांगला नफा मिळवू शकता. सर्वोत्तम परतावा आणि सुरक्षितता ही वैशिष्ट्ये असणारी ही योजना सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय आहे. या योजनेत दररोज एक रुपया इतकी किरकोळ बचत करून तुम्ही मोठी रक्कम साठवू शकता. प्राप्ती कर बचतीचाही लाभही या योजनेला मिळतो. ही योजना आहे सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana). दररोज एक रुपया जरी तुम्ही वाचवला तरी या योजनेत गुंतवणूक करणं शक्य आहे. महिन्याला तीन हजार रुपये गुंतवल्यास तुम्हाला मुदतीनंतर 15 लाख रुपये मिळू शकतात.

काय आहे सुकन्या समृद्धी योजना?

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाअंतर्गत सरकारनं ही अल्पबचत योजना (Small Saving Scheme) दाखल केली आहे. सर्वाधिक व्याजदर असणारी ही योजना आहे.

किमान गुंतवणूक

अवघ्या 250 रुपयांनी खातं उघडून या योजनेत गुंतवणूक करता येते. म्हणजेच तुम्ही दररोज एक रुपया जरी साठवला तरी महिन्याला 250 ते 300 रुपये यात भरू शकता. दर वर्षी किमान 250 रुपये भरणं आवश्यक आहे. तर कमाल दीड लाख रुपये यात भरता येतात.

हे वाचा-आता SBI च्या Debit Card वरही मिळते EMI ची सुविधा, पाहा कसा होईल फायदा

किती व्याज मिळते

सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 7.6 टक्के असून यावर प्राप्ती करातून सवलतीचा लाभही मिळतो. अगदी सुरुवातीला या योजनेचा व्याज दर तब्बल 9.2 टक्के इतका होता. या योजनेत गुंतवणूक सुरू केल्यानंतर आठ वर्षांनी मुलीच्या उच्च शिक्षणासाठी यातून 50 टक्के रक्कम काढता येते.

मुदतीनंतर मिळतील 15 लाखांपेक्षा जास्त रक्कम

या योजनेत दरमहा तीन हजार रुपये गुंतवले तर वर्षाला 36 हजार रुपये गुंतवणूक होईल. 14 वर्षांनी 7.6 टक्के दरानं चक्रवाढ व्याज पद्धतीनं 9 लाख 11 हजार 574 रुपये मिळतील. तर 21 वर्षांच्या मॅच्युरिटीवर तब्बल 15 लाख 22 हजार 221 रुपये मिळतील. यात 7.6 टक्के दरानं मिळणारे व्याज करमुक्त आहे.

खातं कसं उघडता येईल

सुकन्या समृद्धी योजनेचे खाते पोस्टाच्या कोणत्याही शाखेत उघडता येईल. दहा वर्षे वयापर्यंतच्या मुलीच्या नावे हे खातं उघडता येतं. किमान 250 ते कमाल दीड लाख रुपये एका वर्षात भरता येतात.

हे वाचा-सोनेविक्रीच्या नियमाबाबत मोठा निर्णय! तुमच्या सोन्याच्या दागिन्यांवर काय परिणाम?

कधीपर्यंत खातं सुरू ठेवावं लागतं

सुकन्या समृद्धी योजनेतील खातं तुमची मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत किंवा 18 वर्षांची झाल्यानंतर तिचं लग्न होईपर्यंत तुम्हाला हे खातं सुरू ठेवता येतं.

आवश्यक तेवढे पैसे जमा न करता आल्यास?

या योजनेत दरवर्षी किमान 250 रुपये भरावे लागतात. ते भरले नाहीत तर खातं बंद होतं. खातं पुन्हा सुरू करण्यासाठी दरवर्षी 50 रुपये दंड भरून खातं पुन्हा सुरू करता येतं. 15 वर्षांपर्यंत खातं बंद पडल्यास पुन्हा सुरू करण्याची सुविधा मिळते.

First published:

Tags: Investment, Money