नवी दिल्ली, 27 मे: सराफा बाजारात आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात (Gold Price Today) किरकोळ वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. तर चांदीबाबत बोलायचं झालं तर आज चांदीमध्ये जबरदस्त (Silver Price Today) घसरण पाहायला मिळाली. एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) वर गुरुवारी सोन्याचा दर 0.02% च्या तेजीमुळे 48,794 रुपये प्रति तोळा झाला आहे. तर जुलैसाठीच्या चांदीची वायदे किंमत 71,400 रुपयांवर ट्रेड करत आहे. बुधवारी चांदीचे दर 72,631 रुपये प्रति किलो होते.
मार्चमध्ये सोन्याचे दर जवळपास 44000 रुपये प्रति तोळा या सर्वात निचांकी स्तरावर पोहोचले होते. मात्र या महिन्यात पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळते आहे. असं असलं तरीही अद्यापही गेल्यावर्षीच्या सर्वोच्च किंमतीपेक्षा दर कमी आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर प्रति तोळा 56,200 रुपयांवर पोहोचले होते.
हे वाचा-चला, मुंबईत आज पेट्रोलसाठी मोजा 'ही' कोरी करकरीत नोट
आणखी वाढू शकतात सोन्याचे दर
तज्ज्ञांच्या मते सोन्याचांदीच्या किंमतीत आणखी तेजी येण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरस हे देखील सोन्याचे दर वाढण्यामागील एक कारण असू शकतं. या काळात एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात गुंतवणूक केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते येणाऱ्या काळात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचाही सामना करावा लागणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सोन्याचे दर 50 हजारांपेक्षा जास्त होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तुम्ही जर गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सध्याचा काळ योग्य आहे.
हे वाचा-आता SBI च्या Debit Card वरही मिळते EMI ची सुविधा, पाहा कसा होईल फायदा
Gold ETF मध्ये गुंतवणूक वाढली
गेल्या काही दिवसांपासून भारतीय बाजारात Gold ETF (एक्सचेंज ट्रेडेट फंड) मध्ये गुंतवणूक वाढत आहे. सोन्याचे दर वाढल्यामुळे गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक वाढली आहे. सोन्याकडे एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Silver, Silver prices today